आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध योजना सुरुु….

सिंधुदुर्गनगरी :

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्ह्यातील चर्मकार, ढोर, होलार व मोची या समाजीतील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना विविध व्यवसाय करण्यासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेमार्फत कर्ज घेण्यासाठी अनुदान योजनेचे  14 व बीज भांडवलचे योजनेचे 13 असे भौतिक उद्द‍िष्ट प्राप्त झाले आहे. तरी याचा लाभ चर्मकार बांधवांनी घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा