You are currently viewing येत्या आठ दिवसात आगारप्रमुख नेमावा अन्यथा युवासेना स्टाईलने अनोखे आंदोलन छेडू ; योगेश धुरी

येत्या आठ दिवसात आगारप्रमुख नेमावा अन्यथा युवासेना स्टाईलने अनोखे आंदोलन छेडू ; योगेश धुरी

कुडाळ

कुडाळ आगारप्रमुख ही पद गेली कित्येक दिवस रिक्त आहे. या संदर्भात निवेदन दिले होते. मात्र अद्याप आगारप्रमुख, कुडाळ हे पद विभागाकडून नेमले गेले नाही. यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना तसेच प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.उदा आगारात गाड्या बंद राहण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे बस कमतरतेमुळे एसटी वेळेत न सुटणे ,मुलांच्या पासा संदर्भात अडचणी येत आहेत. आगारप्रमुखच नाही तर हे प्रश्न मांडायचे कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुडाळ आगारमध्ये २ वाहतूक निरीक्षक दिले आहेत मुळात त्याची काहीही गरज नाही. आगारप्रमुख नेमला असता तर एक वाहतूक निरीक्षक चालला असता,एसटी विभागाने येत्या आठ दिवसात आगारप्रमुख नेमावा अन्यथा युवासेना स्टाईलने अनोखे आंदोलन करण्यात येईल. असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. यावेळी युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, युवासेना चिटणीस तानाजी पालव, युवासेना शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर, शहर समन्वयक अमित राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =