You are currently viewing परुळेबाजार ग्रामपंचायतीला एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुख्य निवेदिका न्यानदा कदम यांची भेट

परुळेबाजार ग्रामपंचायतीला एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुख्य निवेदिका न्यानदा कदम यांची भेट

परुळे :

 

परुळेबाजार ग्रामपंचयातीला एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुख्यनिवेदिका न्यानदा कदम यांनी भेट दिली. त्या कामाच्या गडबडीतून काही क्षण निवांत घालवण्यासाठी दरवर्षी कोकणात भोगवे येथील महेश सामंत यांच्या “लिलाज बांबू हाऊस” ला येतात. यंदा ही त्यांनी आपल्या कुटुंबासह भेट दिली आहे. त्याचवेळी त्यांनी परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी महेश सामंत, माजी सरपंच प्रदीप प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे आदी उपस्थित होते. कदम यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या काथ्या प्रशिक्षणची माहिती घेतली. महिला काथ्या पासून बनवीत असलेल्या विविध शोभिवंत वस्तूची माहिती घेतली व त्यांचे कौतुक केले. प्रशिक्षक श्री राऊळ यांनी काथ्याच्या विविध शोभिवंत वस्तूची माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा