You are currently viewing फोंडाघाट मध्ये भव्य नरकासुराची मिरवणूक आणि दहन

फोंडाघाट मध्ये भव्य नरकासुराची मिरवणूक आणि दहन

दुष्प्रवृत्तीच्या विनाशासाठी युवाई चे साकडे

फोंडाघाट

नरकचतुर्दशीच्या पर्वसंध्येवर, फोंडा बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली असताना—- आणि आकाशकंदील आणि दिवाळीच्या दिव्यांनी, तोरणांनी झगमगलेली असताना —- सौरभ सुतार मित्र मंडळ आणि गणेश तरुण मंडळ चौकनाका, हवेलीनगर,फोंडाघाट च्या वतीने नरकासुराची भव्य मिरवणूक अन डीजेच्या तालावर नाचणारी युवाई ची मिरवणूक गांधीचौक पर्यंत काढण्यात आली. नरकासुराची भव्यता, क्रूरता आणि भयानकता लाइटिंग च्या माध्यमातून वातावरण उत्साही करत होते.भव्य नरकासुराची संकल्पना सौरभ भोगटे,पुष्पक नाईक,गणेश गांधी, आणि ओम हाऊळ यांनी लिलया आणि हुबहु साकारली होती.

यावेळी श्री देव राधाकृष्ण मंदिरासमोर फोंडाघाट मधील दुष्प्रवृत्तीचा विनाश करून दीपावली आणि येणाऱ्या नूतन वर्षात सुखसमृध्दी साठी साकडे घालण्यात आले. यावेळी सौरभ भोगटे,सौरभ व सचिन सुतार, ओंकार हाऊळ, प्रथमेश भोगटे, ओंकार पवार,नानू पटेल,यश वाळवे ,सागर वाळवे, अण्णा पारकर, प्रवीण पडेलकर, वैभव रावराणे,साहिल बिडये,साहिल सुतार, गणेश गांधी ,कल्पेश मर्गज ,महेश सावंत या सहकाऱ्यांनी मिरवणुकीचे शिस्तबद्ध नियोजन केले.त्यामुळे या रॅलीबद्दल नागरिकांनी सलग तिसऱ्या वर्षीच्या भव्य उपक्रमाचे स्वागत केले. पहाटे उशिरा समाजातील वाईट प्रवृत्ती आणि गोष्टींचे प्रतीक नरकासुराच्या प्रतिमेचे जल्लोषात दहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 16 =