You are currently viewing महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 ही जाहिर झाली असून, शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यातील दोन उपकेंद्रावर एका सत्रामध्ये सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.

या परिक्षेला एकूण 526 उमेदवार बसणार असून, परिक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. उपकेंद्र- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथील बैठक व्यवस्था – KD००१००१ ते KD००१३३६ आणि कणकवली कॉलेज कणकवली (जुनी इमारत) येथील बैठक व्यवस्था – KD००२००१ ते KD००२१९० अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 13 =