रणजित देसाई यांच्या हस्ते साळगाव रुग्णवाहिकेचे लोकार्पण….

रणजित देसाई यांच्या हस्ते साळगाव रुग्णवाहिकेचे लोकार्पण….

कुडाळ

साळगाव गावचे सरपंच उमेश धुरी व‌ रुपेश कानडे मित्र मंडळ यांनी कोरोना महामारी च्या काळात अत्यवस्थ रुग्णांची रुग्णवाहिका मुळे होणारी हेळसांड पाहून ग्रामपंचायत मध्ये रुग्णवाहिका असावी, या हेतूने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज ग्रामपंचायत साळगाव येथे संपन्न झाला,
यावेळी दिनेश साळगावकर जि.प. सदस्य, विनायक राणे तालुका अध्यक्ष भाजप, बंड्या मांडगुळकर प.स. सभापती, रूपेश कानडे युवा तालुका अध्यक्ष कुडाळ, पप्या तवटे युवा तालुका अध्यक्ष ओरोस, मोहन सावंत माजी सभापती, मोहन सावंत माजी उपसभापती, दादा साईल पणदुर सरपंच, अमित दळवी उपसरपंच साळगाव, संतोष डिचोलकर सरपंच बांबर्डे, नागेश परब सरपंच बांव, राजा धुरी तालुका उपाध्यक्ष भाजप, अजय आकेरकर पिंगुळी शहर अध्यक्ष, श्रावण धुरी उपसरपंच माणगाव, एल.एस. धुरी निवृत्त शिक्षक, राजेंद्र धुरी ग्रा.प.सदस्य, साळगाव, अजय डिचोलकर माजी ग्रा.प.सदस्य, गजानन पवार ग्रा.प.सदस्य साळगाव, समिर हळदणकर माजी सरपंच साळगाव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम धुरी व जेरॉन फनाॅडिस, सतिश मालगे, बाबजी तेली माजी उपसरपंच साळगाव, अविनाश धुरी तंटामुक्ती उपाध्यक्ष व आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा