You are currently viewing ०भय०
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

०भय०

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.भारती चव्हाण लिखित अप्रतिम कथा* ‌‌‌‌‌‌

*०भय०*

….काल दिवसभर झोप काढली…लेकीला जिमला जायचे होते..ती सांगून सांगून दमली ”आई!..मला चहा दे ना ग!…”
”थांब थोडा वेळ..माझी झोपच उघडत नाहीए….”
”अग मला जिमला जायचं आहे..उशीर होतोय…’’
मेघाची झोप उघडायला तयार नव्हती..शेवटी कंटाळून ती गेली असावी…कारण जेव्हा तिला जाग आली तेव्हा घरात दिपा दिसली नाही…तिचा जीव धडधडायला लागला..घाबरुन तिनं संडासात पाहिलं..सगळं घर धुंडाळलं..पण कुठेच दिपा दिसेना..”कुठे गेली असेल?….जिमला तर गेली नसावी..सांगून गेली असावी..अशी ती जाणार नाही..झोपेच्या धुंदीत आपल्यालाच ऐकू आले नसावे…अग बाई माझी लेक न चहा पिताच गेली…कसला आपला वेंधळेपणा!…एवढी झोप का येतीय पण आज?…रात्री झोप दिवसा झोप झोपेचे पोते भरतोय आपण…नाही, असा बेसावधपणा काही कामाचा नाही..खर तर ती घाबरली होती..दिपा खरंच कुठे निघून तर नाही गेली?…असं कसं शक्य आहे?..आपली मुलगी असं कोणतंही टोकाची भूमिका घेणार नाही..स्वत:च्या मुलीवर आपला विश्वास हवा..आपणच आपल्या अपत्यावर विश्वास ठेवला तरच समोरचाही ठेवेल ना?…एवढी जौब करतेय…सगळं कस मेनटेंन्ट असतं तिचं…आपल्याही तिच्याकडून काही शिकायला हवं…चला आता आपली फिरायला जायची वेळ झालीय..घरात बसून बसून आपलं बेसुमार वजन वाढतंय…थोडं चालणं बिलणं ठेवलं तर आपलीच तब्येत चांगली राहणार..ती उठली होती…घडळयात पाहिलं सात वाजलेत. ही तर आपली पुजाप्रार्थनेची वेळ.,.देवाला दिवा लावायचा. लक्ष्मि अष्टक म्हणायची वेळ…या वेळेत बाहेर जाऊन बसलं की सगळंच मुसळ केरात…नाही अगोदर लक्ष्मी मैय्या घरात येणार मग आपण आजचा कार्यभाग उदयावर ढकलणार…दिवा तिनं हातानेच साफ केला..दिव्यात थोडं साजूक तूप घातलं..अन काडीने दिवा पेटवला…देवापुढे आरती म्हटली..नैवेदय ठेवला…मेथीची भाजी परतायला घेतली…नादात असतांना भाजीत मीठ टाकायचे विसरते तशी आजही विसरणारच होती…पण आलं लक्षात…चला आज राणी रुसणार नाही की आई रागावणार नाही…तेवढयात दारावरची बेल वाजली..कोण असाव? लागलीच मनात प्रश्न तयार झाला…या अवेळी असं कोण बरं असेल?…एवढा मेंटन्नस घेतात सभासदांकडून एक वाचमैन नाही ठेवू शकत?…सगळा वेंधळा कारभार…कोणी केव्हाही येत अन झाडू घ्या रजया घ्या करत बसत..मेंदूचा एवढा भुगा होतो ना तर काही विचारायलाच नको…आपलं झालंय टम टम बोलून पण ज्याला करावे लागते त्याला समजते काय कष्ट पडतात..खरंच बाई आपण नको असं विचार करायला…तेवढयात दारावरची बेल वाजली…तिनं धावतच जाऊन दार उघडलं समोर रेनकोटमधली राणी उभी होती..किलकिल्या नजरेनं तिनं तिच्याकडे पाहिलं…
“अग,पहात काय बसलीस? दार उघड ना…मला थंडी भरलीय पावसानं…”
”अग, हो..ग,…ये..आत ये चटकन”
तिनं राणीला आत घेतलं..दरवाजा लावून घेतला..अजून दिनेशला यायला अवकाश होता..मेघानं राणीचा रेनकोट काढला..ड्रेसही ओला झाला होता..तिला सर्दी होऊ नये म्हणून नैपकिनने तिचे केस कोरडे केले..तिच्या अंगात कोरडे कपडे चढवले..कौफी हवी होती तिला..गरम गरम कौफी करुन तिला
पाजली अन बेडवर बसवले…राणीला झोप आली होती..ती तशीच झोपून गेली..तरी तिने प्रश्न विचारला, ”मम्मा,दी कुठाय?’’
”अग, बेटा!…दिदू जिमला गेलीय..येईलच एवढयात..अन..तू झोप!…छान झोप येतीय ना तुला..?झोप?”
तिला थोपटत तिच्या अंगावर पांघरुन घातले..राणी गाढ झोपून गेली…तिनं फ्रिजमधून मेथीची भाजी निवडायला घेऊन आली..अर्धी भाजी निवडून होत नाही तेवढयात दिपा आली..शू..शू..मोठयाने बोलू नकोस,राणी उठेल!..”
“पण ती आत्ता का झोपली?..मी येईपर्यंत तर जागीच असते..”
“अग,दिपू तिला बरं नाहीए..अंगात कणकण वाटतेय..पण डाक्टर भिसेच्या औषधानं होईन बरी..नाहीच
डाकटरांकडे नेता येईल..”
“ओके” तिनं मुंडी हलवली..
काहीतरी आठवल्यागत तिनं विचारले,”अग दिपू ,तुला चहा हवा होता ना आल्याचा..”
“हो दे!”. …सोफ्यावर बसत दिपा म्हणाली.
मेघानं दोघींसाठी आल्याचा कडक चहा करुन आणला…मेघानं हळूच विचारलं,” आज नाही ना फोन आला त्या दांडगटाचा..”
आईनं विषय काढताच दिपाला चहा पिता पिता ठसकाच गेला..
“हळू!…”
दिपानं चहा प्यायचा सोडून आईला घटट मिठीच मारली..
“अग,..अग,..घाबरु नको..मी आहे ना जवळ!..”
“हो ग, पण त्याची छबी माझ्या डोळयासमोरुन जात नाही..त्याची अवस्था माझ्याने बघवत नाही..खुप प्रेम करायचा तिच्यावर तो..”
“काय करणार? मेडिकल कॉलेजच्या मुलीला रेप करून जिवंत जाळलं त्या नराधमांनी…अन कुणी काहीच करु शकले नाही…”
बोलता बोलता दिपाच्या आवाजात थरथर अन डोळयात पाणी आले..”
घाबरु नकोस बेटा,आम्ही आहोत ना तुझ्यापाठीशी…”
“मम्मा, प्रकरण दिसतं तसं सोपं नाही..उदया त्यांनी मला प्रांजल सारखंच करण्याचं ठरवलं तर?..”
“नाही ग, असं नाही होणार..तुझे बाबा सब इन्सपेकटर आहेत..त्यांचा केवढा दबदबा आहे शहरात…”
“असली लोकं कुणाला घाबरत नाहीत ग आई!…मला येथून कुठेतरी दूर घेऊन चल..म्हणजे माझ्या डोक्यात भरलेलं…उघडया डोळयांनी पाहिलेला प्रांजलचा मुत्यू…सगळं कसं विसरू शकते मी…” डोळयातले अश्रू पुसत ती म्हणाली…
“तू घाबरु नको!…वेळ आली तर खरी साक्ष दे कोर्टात…तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल…”
दारावरची बेल वाजली…
बाबा आलेत वाटतं…तिनं जाऊन दार उघडलं..डोक्यावरची हैट काढत त्यांनी आत प्रवेश केला…
“कसली रडारड चाललीय?”
“आहो बघाना…धीर सोडलाय पोरीनं पुरता…”
“हो…ती घटना तिनं डोळयांनी बघितली..तिची अवस्था अशी होणारच…शांत हो बाळा,शांत हो!”
घरात सगळेच काळजीत होते…पुर्ण दोन वर्ष चालला हा खटला..दिपाच्या साक्षीनं आरोपींना प्रखर शिक्षा झाली..दिपा आनंदित झाली…पुढे तिने प्रांजलच्या नावाचं तिचं क्लिनिक उघडलं..प्रांजलचा बौयफ्रेड बरोबर लग्न झालं..दोघांना एका वर्षात एक गोड गोंडस मुलगी झाली तिचं नांव ‘प्रांजल’ ठेवलं…अन कहाणी संपली….
— शोभावती

Advertisement

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 2 =