You are currently viewing बाब्या

बाब्या

*लोक साहित्य परिषद, हिंगणघाट, जि. वर्धा संस्थेचे संस्थापक सचिव ज्येष्ठ लेखक कवी ज्ञानेश्वर चौधरी लिखित अप्रतिम कथा*

*बाब्या*

नदीकाठी वसलेलं खेडेगाव.गावात एक केशव नावाचा शेतकरी होता. केशवकडे गावाशेजारी शेती होती. सुखी समाधानी केशवचं कुटुंब होतं. केशवला पाच मुले होती. मोठा मुलगा केशवला शेतीकामात मदत करू लागला. दुसरा मुलगा बाहेरगावी नौकरी करू लागला.

केशवकडे चारबैल होते. दोन जोडीवरच शेतीची मशागत,पेरणी,डवरण ईत्यादी कामे पार पडत. या चार बैलामध्ये *बाब्या* नावाचा डौलदार देखणा बैल होता. भरतीच्या गाडीला जुंपा अगर रेंगीला धाव पूढेच असायची. त्याचे जोडीदार बदलल्या गेले पण बाब्यानं खुंटा सोडला नाही. बाब्याचं आगमन केशवला लाभदायी ठरलं होतं. म्हणून बाब्यावर केशवचा विशेष लोभ होता. गोठ्यातून जातायेता त्याच्या पाठीवरून हात फिरवणे, त्याला आवडीने कडबा कुटार टाकणे हा केशवचा नित्यक्रम. एकादशीला मंदिरातून कीर्तन ऐकून आल्यावर रात्री गोठ्यात जाऊन बाब्या झोपला कारे केशवने म्हणताच बाब्या पटकन ऊठायचा व मान हलवायचा.

केशवने पंचाहत्तरी पार केली. चिलीमीच्या सवयीने छातीत कळा यायच्या. खोकल्याच्या ऊबळीवर ऊबळी यायच्या. दम्याचा जोर वाढला,अन् केशवने अंथरुण धरले. बाब्याचही वय झालं होतं. त्याला शेतीच्या कामाला जुंपत नव्हते. मोठा मुलगा म्हणायचा, *बा* आपण बाब्याला विकून टाकू ! बा म्हणायचा नाही खुट्यावर मरल पण ईकाचा नाई कसायाले. बा चा निर्धार कायम होता.

बा दिवसे न दिवस प्रकृतीने खंगत चालला होता. एक दिवस अंथरूणावरून ऊठून गोठ्यात बाब्याजवळ गेला,पाठीवरून हात फिरविला अन् बाब्याला म्हणाला, बाब्या आता माय काई खरं न्हाई रे…! बा ला ग्लानी आली बा कोसळला. तसा बाब्याने जोराचा हंबरडा फोडला. रात्रीची वेळ मोठा मुलगा शंकर दचकून ऊठला व गोठ्यात गेला. बा पडलेला दिसताच तो घाबरला. बा ला ऊचलले व अंथरूणावर आणले.तो वर घरातील सर्वच जागे झाले. बा ची तब्येत चिंताजनक होती. सकाळी बाब्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून घरातील सर्वच गहिवरले. बाब्याने अन्न पाणी सोडले.

बा ला सकाळी जिल्ह्याच्या दवाखान्यात भरती केले. बा शुद्धीवर आला केवळ एवढं सांगण्यासाठी की *बाब्याला ईकू नका खुट्यावर मरू द्या.* आणि बा ने डोळे मिटले.
बा ला घरी आणले.
क्षणभर बाब्याजवळ ठेवले. बाब्याच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते.

बा चा आज तिसरा दिवस. पाहूणे मंडळी तिस-या दिवसाच्या क्रियाकर्मासाठी नदीवर गेले. क्रियाकर्म आटोपून घरी आलेत. तर काय!
बाब्यानेही खुंट्यावर जीवन यात्रा संपविली होती.
प्राणीमात्रांनाही संवेदना,भावना असतात. प्रेम जीवनातील आनंद म्हणून प्राणीमात्रावरही प्रेम करा.

रामेश्वर ऊर्फ ज्ञानेश्वर चौधरी(शेन्द्रीकर)
हिंगणघाट.जि वर्धा.
४४२३०१
भ्र. क्र. ८६६८८१६०७५

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

 

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 15 =