You are currently viewing मन:स्पर्शीत
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

मन:स्पर्शीत

*”लेखक कवी राजू गरमडे यांनी लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे लिखित “मनःस्पर्शीत” या कथासंग्रहाचा दिलेला पुस्तक परिचय”*

**मन:स्पर्शीत**
{ कथासंग्रह }

✍️ लेखिका :- सौ.शोभा वागळे.B.A.B.ED.
जोगेश्वरी पूर्व,मुंबई.
मोबा.नंबर :- 8850466717

☀️ मानवी जीवन सुंदरपणे जगण्यासाठी प्रेरीत करणार्‍या आणि रसिक वाचकांना अंर्तमुख करणार्‍या,जगण्यासाठी बळ देणार्‍या सर्वांगसुंदर कथा ☀️
<><><><><><><><><><><><><><><><><><><><>

कथा म्हटल्या की,वाचण्याची ऊत्कंठा निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.कारण कथा या मानवी मनाचा ताबा घेऊन कथेमध्ये गुंतवून ठेवतात.
कारण कथेमध्ये ‘ पुढे काय ‘ घडणार आहे हे वाचकांनाही माहित नसतं.फक्त आपण पुढे काय घडणार आहे यांची माञ कल्पना करु शकतो.


आज कथेच्या सौंदर्यामध्ये दिवसागणिक भरच पडत आहे.
माणसाला बोध देणार्‍या आणि अंर्तबाह्य हेलावून सोडणार्‍या,मंञमुग्ध करणार्‍या कथा,जीवन सुंदरतेने जगायला शिकविणार्‍या कथा वाचल्या की,आपल्याला हे जग सुंदर वाटायला लागतं आणि आपल जगणही.

मराठी साहित्यविश्वामध्ये अनेक लेखक,लेखिकांचे कथासंग्रह आपण वाचलेले असतीलच.
त्या कथासंग्रहामध्ये सुप्रसिद्ध कवयिञी,लेखिका आणि सेवानिवृत्त शिक्षिका शोभा ताई वागळे यांच्या * मन:स्पर्शीत * या कथासंग्रहाची भर पडलेली आहे.
विशेष सांगायच म्हणजे या कथासंग्रहाला माझी प्रस्तावना आहे.
ताईनी माझ्यासारख्या वाचकाला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
हा कथासंग्रह जून २०२२ ला प्रकाशित झालेला आहे.
साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स च्या सुनिल खंडेलवाल सरांनी अगदीच देखण्या स्वरुपात रसिक वाचकांसमोर आणलेले आहे.

ताईनी हा कथासंग्रह मला सस्नेह भेट म्हणून पाठविलेला होता.
या कथासंग्रहावरील कथेवर मी लिहिणारच होतो.त्या अगोदरच हा कथासंग्रह मिञानी वाचायला नेला आणि काही दिवसापुर्वीच तो मला परत मिळाला.त्यामुळे या कथासंग्रहामधील कथा पुन्हा एकदा वाचताना मला वेगळीच सुखद अशी अनुभूती मिळाली.

२००५ मध्ये * जगावेगळी आवड * ही पहिली कथा त्यांनी लिहिली होती.शाळेमध्ये शिकवित असताना
* पैसे परत करा * हे स्वलिखीत नाटक त्यांनी बसवले होते.या त्यांच्या नाटकाला प्रथम क्रंमाकाच पारितोषिकही मिळाले होते.शिक्षण अधिकार्‍यांनी त्यांच कौतुकही केलेल होत.
नंतर त्यांनी शाळा आणि संसार या व्यापातून वेळ काढून त्या कविता,लेख,कथा,गझल,पुस्तक परिक्षण,संवाद-लेखन लिहू लागल्या.विविध संमेलने,मुशायरे यामधून सुञसंचालनही करु
लागल्या.अनेक वर्तमानपञामध्ये त्यांच्या कविता,लेख प्रकाशित होऊ लागले.अनेक व्हाॅटसअॅप व फेसबुक समूहाशी त्या जोडल्या गेल्या.

नंतर स्टोरी मिरर वर त्या लिहू लागल्या.त्यांच्या लेखनांना ट्राॅफी,सर्टिफिकेट मिळत गेले.शिवाय दिवाळी अंकामधूनही त्यांच्या कविता,लेख,कथा प्रकाशित झालेल्या आहेत.
तसेच त्यांच ‘ शोभाची लेखणी ‘ नावाच पेज ही त्यांनी काढलेल आहे.
त्यांना काव्यलेखनासाठी * काव्य- सम्राज्ञी * यासारखे पुरस्कारही लाभलेले आहेत.

🪷 कवयिञी,लेखिका सौ.शोभा वागळे यांच्या साहित्य वाटचालीमधील काही महत्वाच्या ऊपलब्धी :-

🎗️काव्यव लेखनासाठीचा * काव्य-सम्राज्ञी * हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
🎗️स्टोरी मिररचा ‘ आॅथर आॅफ दी वीक ‘ आणि ‘ आॅथर आॅफ दी इयर ‘ २०२० व २०२१ असे सतत दोन वर्ष नामांकन.
स्टोरी मिरर तर्फे ऊत्कृष्ठ कथालेखनास ट्राॅफी व सन्मानपञ प्रदान.
🎗️’ शोभाची लेखनी ‘ नावाच त्यांच एक पेजही आहे.
🎗️प्रतिलिपी,दिवाळी अंक,विविध वृत्तपञामध्ये त्यांच्या कविता,लेख,गझल प्रकाशित झालेल्या आहेत.
🎗️भारतीय योग संस्थान नवी दिल्लीच्या जोगेश्वरी,अंधेरी मुंबई प्रांतची प्रधान म्हणून कार्यरत.
नि:शुल्क सेवा.
🎗️सर्वोत्कृष्ठ,ऊत्कृष्ठ ते लक्षवेधी जवळपास ५०० च्या वरती सन्मानपञे.
🎗️ ‘ ऊत्कृष्ठ शिक्षक ‘ पुरस्काराने सन्मानीत.

*** कथेमध्ये मानवी जीवनाच प्रतिबिंब पडलेल असत अस म्हटल जातं.
कारण मानवी मन हे काहीस गुंतागुंतीच आणि अनाकलनीय आहे.शिवाय माणसाच्या सर्वच इच्छा पुर्ण होतातच अस नाही.
त्यामुळे कथा या मानवी विचारांना,इच्छांना काही क्षण का होईना मुर्त रुप देण्याचे कार्य करीत असतात.

** या संग्रहातील कथा निश्चितच मानवी मने प्रज्वलित करणार्‍या आणि मनाची भावस्पंदने टिपणार्‍या आहेत.

🍁 कातरवेळ :-
– बालपणी मनात रुजलेल प्रेम सत्यात ऊतरतेच अस नाही.काही गोष्टी आपल्याला मनातच दडवून ठेवाव्या लागतात.पण नियती आपल्यासमोर कधी कोणती वेळ आणेल हे सांगता येत नाही.
आई वडिल मरण पावल्यानंतर रमेश मुंबईला पोटापाण्याच्या ऊद्देशाने जातो.गावचे घर विकून टाकावे या ऊद्देशाने तो कागदपञे घेण्यासाठी आपल्या गावाला जातो.तिथे त्यांची भेट बालमैञीण नेहाशी होते.
नेहाचे लग्न झालेले असते का ? पुन्हा नेहाच्या आयुष्यात रमेश येईल का ? तो आपले घर विकेल काय ? या सार्‍या प्रश्नाची ऊत्तरे या कथेमध्ये वाचकांना वाचायला मिळेल.

🍁 गुप्तदान :-
नियती कधी कुणाला रावाचा रंक आणि रंकाचा राव बनवील हे सांगता येत नाही.
मालतीबाई कडे घरकाम,धुणीभांडी करण्यासाठी यमुनाबाई येत.मालतीबाईची मुलीचे नाव प्रज्ञा होते व यमुनाबाईच्या मुलीचे नाव सीमा.दोघी एकाच वर्गात असल्या तरी वेगवेगळ्या शाळेत शिकत होत्या.सीमा सुद्धा आपल्या आईची प्रकृती ठिक नसली की,मालतीबाईच्या घरी काम करण्यासाठी येत.तरीपण,प्रतिकुल परिस्थीती असतानाही सीमा डाॅक्टर कशी बनली आणि प्रज्ञा चे काय झाले हे कथालेखिकेनी अतिशय सुंदरपणे गुंफलेले आहे.

🍁 भय :-
भय असणं चांगल असल अस काहीजण म्हणतात.त्यानिमित्ताने आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याचा प्रयन्न करतो.
तरीपण,माणसाने नेहमीच भयमुक्त जीवन जगण्याचा प्रयन्न केला पाहिजे.भीती काहीवेळा आपल्याला चांगले काम करण्यास प्रेरणाही देत असते.
बालपणी घडलेल्या काही घटना आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसतात.त्या कशा प्रकारे आपल्या अंतर्मनावर आघात करतात हे भय या कथेमधून लेखिकेनी छान ऊलगडले आहे.

🍁 रिपोर्ट :-
आनंदी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच ही कथा.
लेखिकेने आपल्या प्रतिभेद्धारे आणि अनुभवाच्या गाठोडीतून या कथेला सुंदर असा साज चढविला आहे.
आपली जगण्याची शैली कशी असायला हवी आणि खरच जीवनाचा आनंद कशा प्रकारे घ्यायला हवा हे सांगणारी नितांतसुंदर अशी कथा.
सरलाला जेव्हा कळत की,आपल्याला आतड्याचा कॅन्सर झालेला आहे आणि त्या फक्त ६ महिनेच जगणार आहे तेव्हा त्यांनी काय केले असेल ?
परिस्थीतीपुढे शरणागती पत्करुन दवाखान्यात भरती होण्याचा मार्ग स्विकारला असेल किवा मिळणार्‍या ६ महिन्याचा आनंद कशा प्रकारे घेतलेला असेल यांच ह्रदयस्पर्शी चिञण लेखिकेनी या कथेमधून केलेल आहे.

🍁 फसवणूक :-
आजच जग हे तंञज्ञानान वेढलेल आहे आणि युवा पीढीच तर एक पाऊल समोरच पडत आहे हे आपण पाहतोच.या युवा पीढीला आपण सगळ काही देत असलो पण जर योग्य वयात त्यांना संस्काराचे,नीतीमत्तेचे,मानवी मुल्यांचे धडे जर दिले नाही तर आपल्याच आईवडिलांना ही पीढी फसवायलाही मागेपुढे पाहात नाही.
आपल्या लेकरावर आंधळ प्रेम करणार्‍या प्रत्येक आईवडिलांनी ही कथा नक्कीच वाचायला हवीच.

🍁 देवदासी :-
ही कथा देवदासी प्रथेविरुद्ध बंड करणार्‍या सुंनदा नावाच्या मुलीची आहे.ती स्वतःला देवदासी बनण्यापासून कशी वाचविते ?
या तिच्या लढ्यामध्ये तीची मदत कोण करतात आणि नंतर ती नामवंत सर्जन कशी बनते यांच सुंदर अस चिञण लेखिकेनी या कथेमधून केलेल आहे.

🍁 अंगापेक्षा बोंगा जड :-
दुसर्‍यांनी आपल्याला मान द्यावा,चांगले म्हणावे असे अनेकांना वाटत असते.
एक प्रकारे स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अशा प्रवृत्तीचे लोक प्रंसगी कर्जाऊ रक्कम घेतात.
आणि दुसर्‍यासमोर आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन मांडतात.
रावसाहेबांनी आपल्या मुंलीच्या लग्नामध्ये अमाप खर्च केला.मुंलाकडच्या मंडळीसमोर आपल्या एश्वर्याच प्रदर्शन मांडल.शेवटी श्रीमंतीचा थाट दाखविणार्‍या रावसाहेबाची श्रीमंती टिकून राहते की,रावसाहेब कफल्लक होतात हे कथेमधूनच वाचकांना कळेलच.शेवटी स्वतःजवळ काही नसताना श्रीमंतीचा ऐट दाखविणार्‍या लोकांसाठी ही कथा त्यांचे डोळे ऊघडणारी आहे.

🍁माई :-
तरुणपणी अचानक आलेल्या जबाबदारीने माईच्या आयुष्याने कसे वळण घेतले आणि ज्या प्रेमाला आपण तरुणपणी नकार दिला तेच प्रेम सेवानिवृत्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात कसे परत येते हे सुंदरपणे मांडणारी ही कथा आहे.
तिच्या एकाकी,निरुत्साही जीवनामध्ये वंसत कसा फुलतोय हे वाचणे रसिक वाचकांसाठी सुखद अशी बाब असेलच.

🍁 अंतराळ :-
माणसाने पर्यावरणाची हानी करताना आपल्या समोरच्या भविष्याचा विचार केलेला नाही.आपण त्या चुका केलेल्या आहे त्या भविष्यात आपल्यालाच भोगायला लागणार आहे हे दर्शविणारी ही कथा आहे.
वाचकांनी या कथेमधून धडा घ्यायला हरकत नाही.नाही तर अवघी मानवजात नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

🍁 यशोधा :-
यशोधा आपला पती नंदनसोबत आपल्या संसारामध्ये सुखी होती.कारखान्यातील एका अपघातामध्ये अपघात होऊन नंदनचे पाय गेले.त्यामुळे नंदनच्या जागेवर यशोधेला नोकरी लागली.
पण,पगाराचे वाटप करणारा मुकादम यांची नजर चांगली नव्हती.शेवटी यशोधेने मुकादमला कसा धडा शिकविला हे कथेमधून लेखिकेने सुंदरपणे मांडलेले आहे.

🍁 शोध सुखाचा :-
सुख हे मानण्यावर आहे.तसेच सुखाच्या कल्पनाही प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात.आपल सुख कशात आहे हे एकदा कळलं की,आपल जगण आनंददायक होत.
यशश्री ने परदेशातून एम.एस.ही पदवी घेतली.प्रख्यात सर्जन बनली.
पण,आपण आपल्या गावातील लोकांसाठी काहीतरी करावे या ऊद्देशाने तीने असे काही केले की,तिच्या आईवडिलांना तिचा अभिमान वाटला.
कुणाला सुख कशात दिसत.
ते यशश्री ला कशामध्ये दिसल हे वाचणं वाचकांसाठी आंनदी असेलच.

या कथासंग्रहातील इतरही कथा वाचकांच भावविश्व नक्कीच ऊजळून टाकणार्‍या आहेत.
प्रातिनिधीक स्वरुपात काही कथांचा ऊल्लेख करावयाचा झाल्यास,
‘ आभाळमाया ‘ ‘ खेळ नियतीचा ‘
‘ सुपर माॅम ‘ ‘ जगावेगळी आवड ‘
‘ जिद्द ‘ ‘ बंध प्रितीचे ‘ या कथांचा करता येईल.

लेखिका शोभा वागळे यांचा ‘ मन:स्पर्शीत ‘ हा कथासंग्रह मानवी जीवनावर,नातेसंबधावर आणि माणसांच्या मनोप्रवृत्तीवर सुंदरपणे भाष्य करणारा आहे.
मानवी जीवन सुंदरपणे जगायच असेल आणि आपल्या जगण्यामध्ये विचारांच आणि भावनांच सौदर्य ऊतरायला हव अस वाटत असेल तर रसिक वाचकांनी हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा.
या कथासंग्रहातील कथा आपल्या अंर्तदृष्टीला एक वेगळीच दिशा देईल,नवी ऊमेद आणि जगण्यासाठी बळ आणि ऊर्जा नक्कीच देईल यात शंका नाही.

‘ मन:स्पर्शीत ‘ या कथासंग्रहाची प्रस्तावना माझी { राजू गरमडे,चंद्रपूर } यांची आहे.
तर या कथासंग्रहाला शुभेछा प्रा.विजय काकडे,कथालेखक,बारामती.जि.
पुणे,प्रा.शांताराम हिवराळे,पिंपरी,पुणे.यांच्या लाभलेल्या आहेत.
तर पाठराखण दीपक परशुराम पटेकर,कार्य.संपादक.संवाद मिडीया यांनी केलेली आहे.

पुनश्च मी लेखिका सौ.शोभा वागळे यांचे मनपुर्वक अभिनंदन करतो.त्यांच्या पुढील साहित्यवाटचालीला आणि पुढील आयुष्याला शुभेछा देतो.पुढेही त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित होत राहो,त्यांच्या साहित्यकृतीना मानसन्मान लाभत राहो अशी मंगल कामना करतो आणि थांबतो.

दि.१९ नोव्हेंबर २०२२ – राजू गरमडे,चंद्रपूर.
ऊर्जानगर,चंद्रपूर.
<><><><><><><><><><><><><><><><><><><><>
कवितासंग्रहाचे नाव :- मन:स्पर्शीत
लेखिका :- शोभा वागळे
प्रकाशक :- साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन,पुणे.
प्रथमावृत्ती :- जून २०२२
प्रस्तावना :- राजू गरमडे,चंद्रपूर.
पृष्ठे :- ८४
मूल्य :- ₹ १५०/-
<><><><><><><><><><><><><><><><><><><><>

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + twelve =