You are currently viewing दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय ‘वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग, टी बी मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी..

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय ‘वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग, टी बी मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी..

दोडामार्ग

‘वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांनी केंद्र सरकारच्या “निश्चय मित्र” अभियानामध्ये सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने पुढील सहा महिण्यासाठी चार टी बी रुंग्णांना पोषक आहार देऊन मदत करण्याचे ठरविले आहे. या अभियानामध्ये दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय सहभागी झाले आहे.

भारताच्या राष्ट्रव्यापी मिशनचे प्रधानमंत्री” टी बी मुक्त भारत अभियान” त्याचे उद्धीष्ठ 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी “वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग” चे श्री संजय सावंत, श्री संजय नाटेकर, अनुराग सिनारी, भगीरथ पुरोहित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐव्हाळे, आरोग्य सहाय्यक श्री करमळकर. गजानन भणगे, राजेश वाघाटे स्वप्नील गवस, आदी उपस्थित होते या वेळी संजय सावंत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.. याच प्रमाणे . डॉ ज्ञानेश्वर ऐव्हाळे यांनी तमाम दोडामार्ग मधील समाज सुधारक किंवा सेवा भावी संस्था यांना आवाहन केल आहे कि त्यानी पुढे येऊन सहकार्य करावे यावेळी कार्यक्रमाचे आभार श्री. अजित सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =