You are currently viewing यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी मागील दोन शैक्षणिक वर्षात बी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबईचे विश्वस्त व अध्यक्ष नितीन मणियार व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजच्या अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, प्राचार्य डॉ.विजय जगताप उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या संकेतानुसार मान्यवरांनी पगडी वेष परिधान केला होता.
नितीन मणियार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने मुंबई विभागात अल्पावधीत कमावलेल्या नावलौकिकाची प्रशंसा केली. विजय पाटील यांनी कॉलेजच्या प्लेसमेंट सेलचे कौतुक करत विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल करीत असलेले कार्य, भविष्यात या क्षेत्रात येणारी आव्हाने व संधी याविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संजीव देसाई यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर आलेल्या सामाजिक जबाबदारीची करून दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.विजय जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नमिता भोसले यांनी केले. पदवीदान समारंभासाठी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + three =