You are currently viewing विलास पेंडूरकर यांना राष्ट्रपती पदक

विलास पेंडूरकर यांना राष्ट्रपती पदक

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवडाव गावचे सुपुत्र सहायक पोलिस निरीक्षक विलास विठ्ठल पेंडूरकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता नुकतेच राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले .

महामहिम राजपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राज भवन, दरबार हॉल येथील अलंकरण समारंभात पोलिस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल “राष्ट्रपतीं पोलिस पदक” राष्ट्रपतीच्या वतीने प्रदान करण्यात आले. पेंडूरकर हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते . सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत . मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांना यापूर्वी महासंचालक पदक, 138 रिवॉर्ड्स तसेच 37 विशेष प्रशस्तीपत्रक प्राप्त झाली आहेत. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले . त्यांच्या पत्नी सौ वृंदा विलास पेंडूरकर ह्या समाज संस्थेच्या मध्य मुंबई विभागीय महिला समितीच्या सक्रिय सदस्य व कार्यकर्त्या आहेत. पेंडूरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा