You are currently viewing अवैद्य धंद्यापासून भावी पिढीला वाचवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी, पालकांनी आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज….

अवैद्य धंद्यापासून भावी पिढीला वाचवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी, पालकांनी आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज….

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे आवाहन

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खरेदी विक्री सुरू आहे. गोव्यावरून सावंतवाडी व तेथून संपूर्ण जिल्ह्यात या अमली पदार्थांचे जाळे विणले गेले आहे. अनेक तरुण तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. तसेच काही लोकप्रतिनिधीही मटका जुगारचे काम करत आहेत. त्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अवैद्य दारू धंद्यातही ही अनेक तरुण मंडळी गुंतलेली आहेत. या मोठ्या समस्येबाबत पक्षीय राजकारण न करता पालक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, पोलिस यांनी एकत्र येऊन भावी पिढी वाचवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. मध्यंतरी हिरोइन कनेक्शन असलेल्या काहींना अटक झाली होती. मुंबईत आत्महत्या केलेल्या सुशांत सिंग राजपूत या प्रकरणातील अमली पदार्थांची लिंक गोव्याची आहे. सिंधुदुर्गमध्ये ही याच गोव्याच्या लिंकमधून अमली पदार्थ जिल्ह्यात येतात. कुडाळ एमआयडीसी एरिया तसेच हायवे वरील एका स्वामिलच्या पाठीमागे तरुण-तरुणी एकत्र जमतात. या अमली पदार्थांच्या आहारी जाणारी ही पिढी वाचविण्याची गरज आहे, असेही उपरकर यांनी म्हटले आहे. या अमली पदार्थांच्या अंमलाखाली कुडाळमध्ये फंड पेटी फोडण्याचा प्रकार घडला. भविष्यात घरफोडी बलात्कार असे प्रकारही यातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी आपली पाल्ये काय करतात? कुठून पैसे आणतात? रात्री-अपरात्री कुठे फिरतात? याबाबत पालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे. गोव्यावरून सावंतवाडीत येणाऱ्या अमली पदार्थ मध्ये एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत. त्यातील एक व्यक्ती ती गोव्यातील स्टॉलवरून दिवसाला चार चार वेळा जाऊन येतो. त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात माया गोळा झालेली आहे, अशी संपूर्ण सावंतवाडी चर्चा आहे अशाच प्रकारे तरुण अवैध मटका जुगार यात गुंतलेले दिसतात. जिल्ह्यात काही लोक प्रतिनिधी मटका, जुगाराचे काम करत आहेत. झटपट पैशासाठी ते या तरुणांचा वापर करतात. यातून काही तरुण व्यसनांच्या मोठ्या प्रमाणात आहारी जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =