You are currently viewing कासार्डे परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

कासार्डे परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

साळिस्तेत वीज पडुन एकाचा मृत्यू ; कासार्डे पोलिस दुरक्षेत्रही गेले पाण्याखाली!

 

तळेरे: प्रतिनिधी

 

कणकवली तालुक्यातील कासार्डे, तळेरे, साळिस्ते परिसरातील आज सायं. ४वा.च्या सुमारास वीजांच्या प्रचंड कडकडाटासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला आहे. यात साळिस्ते येथील पांडुरंग नारायण गुरव यांचा घरावर वीज पडुन मृत्यू झाला आहे. कासार्डे परिसरात प्रचंड कडकडाटासह जोरदार ढगफुटी झाल्याने सर्व्हिस रोड,कासार्डे पोलिस दुरक्षेत्रही पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.तर देऊलकरवाडी येथील महापुरुषांच्या मंदीर परिसरही जलमय झाला होता.

शुक्रवारी दुपारनंतर अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे काही क्षणातच ओढे,नाले तुडुंब भरून वाहत अनेक रस्ते पाण्याखाली गेले. मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे तिठावरील सर्व्हिस रोड,कासार्डे पोलिस दुरक्षेत्र संपूर्ण पाण्याखाली गेले होते. या पोलिस दुरक्षेत्राची जवळपास खिडकीपर्यत पाणीत इमारत बुडाली होती. महामार्ग ठेकदाराचे नियोजन शुन्य कामाची याठिकाणी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चांगलीच पोलखोल झाली आहे.

मात्र पाऊस कमी झाल्यानंतर पाण्याची पातळी कमी होताच हळूहळू वाहतूक पुन्हा पुर्ववत झाली. साधारणपणे शाळा सुटण्याच्यावेळीच ३० ते ४५ मिनिटांत प्रचंड पाऊस कोळसल्याने विद्यार्थी वर्गांचेही हाल झाले. कासार्डे तांबळवाडी- तर्फेवाडीतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परतीच्या पावसाचा शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 14 =