You are currently viewing एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 21 डिसेंबरला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 21 डिसेंबरला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचे एसटी कामगारांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. आम्ही कोणतीही चुकीची घोषणा दिली नसल्याचं सांगितलं. आम्ही अहिंसक पद्धतीने आंदोलन करत आहोत. एका कष्टकर्‍यांनं एसटीवर दगड मारलेला नाही. 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या पाहता न्यायालयाने आदेश पारित करावा, असं सांगितल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढील सुनावणी पूर्वी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याचे आदेश दिल्याचे ॲड. सदावर्ते यांनी सांगितलं.
यावेळी त्यांच्यासोबत ॲड. जयश्री पाटील, ॲड. विशाल जाधव, ॲड. गुरुनाथ आईर, ॲड. प्रदीप झा यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा