You are currently viewing मोदी सरकारच्या काळात महिलांचा सन्मान – सौ.निलमताई राणे

मोदी सरकारच्या काळात महिलांचा सन्मान – सौ.निलमताई राणे

मोदी सरकारच्या काळात महिलांचा सन्मान – सौ.निलमताई राणे

मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या यातून महिलांचा विकास झाला व त्या सन्मानाने समाजात वावरू शकल्या

देवगड

केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांनी जिल्ह्यात 200 कोटी खर्च करून ट्रेनिंग सेंटर उभे करण्याचे काम नारायण राणे यांनी केले. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नामदार नारायण राणे यांना मत देऊन मोदींचे हात बळकट करा असे आवाहन नीलम ताई राणे यांनी पाटगाव येथील महिला मेळाव्यात केले.

पाटगाव पोंभुर्ले व बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघातील सरकारच्या लाभार्थी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या
व्यासपीठावर जिल्ह्याचे अध्यक्ष श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर मेघा गांगण, सुमेधा पाताडे, ज्योती पाळेकर,देवगड तालुका महिला तालुकाध्यक्ष संजना आळवे, उषःकला केळुसकर, प्रियांका साळस्कर, तनवी चांदोस्कर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम माजी सभापती रवी पाळेकर, बाळ खडपे,  बंड्या नारकर उपस्थित होते

मोदी सरकार आल्यावर देशात सकारात्मक बदल झाले. महिलांसाठी अनेक योजना आल्या. महिलांना न्याय मिळाला. पुन्हा मोदी सरकार येणार आहे. यामुळे नारायण राणे पुन्हा खासदार होण्यासाठी आपल्या मताची गरज आहे. केवळ आपण नाहीतर शेजाऱ्या पाण्यातील महिलाना ही मतदानासाठी सांगावे असे आवाहनही नीलमताई राणे यांनी केले

यावेळी महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, प्रियंका साळस्कर, तनवी चांदोसकर, यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला सेलच्या तालुकाध्यक्ष संजना आळवे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा