You are currently viewing भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पाठपुराव्यामुळे आरोंदा – परेल गाडी पुन्हा एकदा १५ सप्टेंबर पासुन सुरु – प्रवाशांमध्ये समाधान

भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पाठपुराव्यामुळे आरोंदा – परेल गाडी पुन्हा एकदा १५ सप्टेंबर पासुन सुरु – प्रवाशांमध्ये समाधान

*भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पाठपुराव्यामुळे आरोंदा – परेल गाडी पुन्हा एकदा १५ सप्टेंबर पासुन सुरु* – *प्रवाशांमध्ये समाधान*

*भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकारी यांची विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी विविध समस्यांवर यशस्वी चर्चा*

आज दिनांक 31-08-2023 रोजी विभाग नियंत्रक श्री अभिजित पाटील यांच्या सोबत सेवा शक्ति संघर्ष कामगार संघातील पदाधिकारी यांची सिंधुदूर्ग विभाग आगारातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सदर बैठकीस भाजपा मा.आमदार श्री राजन तेली साहेब , सेवा शक्ति संघर्ष संघाचे विभागीय अध्यक्ष गोट्या सावंत साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सेवा शक्ती संघर्ष वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना ( बाळू ) देसाई साहेब, विभागीय उपाध्यक्ष भरत चव्हाण, सहसचिव प्रशांत गावडे, वेंगुर्ला आगार सचिव दाजी तळवणेकर, वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष भाऊ सावळ, कणकवली आगार अध्यक्ष मनोजकुमार पवार, कणकवली आगार उपाध्यक्ष गुरुप्रसाद सामंत, मीडिया प्रमुख उदय मसुरकर, संकेत फोंडेकर, विराज पोईपकर, तांबे यांच्या उपस्थितीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली आणि सर्व विषय तात्काळ मार्गी लावण्यात आले
1) आरोंदा परेल ही फेरी प्रवाशांच्या मागणीनुसार दिनांक 15-9-2023 रोजी पासून पूर्वव्रत चालू करण्यात येईल.
2) 15 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या सण उचल चालढकल संदर्भात पाठपुरावा केल्याने दिनांक 5सप्टेंबर पर्यंत सण उचल फॉर्म भरून घेण्यास विभाग नियंत्रक साहेब यांनी मान्यता दिली,
3) प्रलंबित आगार निहाय बदल्या तात्काळ करण्यात येतील.
4) वेंगुर्ला आगार प्रशासकीय अधिकारी यांनी आपली टेबल एसटी कन्टींग जागेत नेवून काम करत असल्या संदर्भात तसेच शिरोडा स्टँड अधीकृत कंट्रोलर देण्या संदर्भात मागणी करण्यात आली
अशा बऱ्याच मुद्यांवर वादळी चर्चा होवून विभाग नियंत्रक साहेबांना वेंगुर्ला तालुका भाजपा प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या हस्ते आरोंदा परेल बस चालु करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nine =