शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एन एम सी मान्यतेसाठी मी स्वतः लक्ष घालणार…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एन एम सी मान्यतेसाठी मी स्वतः लक्ष घालणार…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जिल्ह्यातील युवकांना शब्द

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) ची मान्यता प्राप्त व्हावी यासाठी पंतप्रधानांचे शेर्पा, राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री सन्मानीय श्री सुरेश प्रभू यांची जिल्ह्यातील युवकांनी सावंतवाडी, कणकवली, मालवण, शिरोडा या तालुक्यात श्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या भेटी वेळी त्यांची भेट घेऊन निवेदन दिली आहेत.

यावेळी ४ जानेवारी रोजी कणकवली येथील भाजप कार्यालयात श्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली असता जिल्ह्यातील युवकांनी तिथे त्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर श्री सुरेश प्रभू यांनी आपण यासाठी विशेष लक्ष घालून जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी केंद्रातून *राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग* (NMC) ची मान्यता प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द त्या युवकांना दिला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवश्यक असून, माझ्या प्रिय जिल्ह्याला आरोग्य सारख्या प्रश्नासाठी दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून रहावे लागू नये यासाठी केंद्रातील आपली ओळख व राजकीय वजन वापरून लवकरात लवकर एन एम सी ची मान्यता मिळवून देईन असा विश्वास त्यांनी दिला आहे.

यावेळी कणकवली येथे निवेदन देताना तुषार राणे, लक्ष्मण गावडे, प्रभाकर परब, सौरभ नागोळकर आणि शुभम घावरे आदी युवकांनी यावेळी भेट घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा