You are currently viewing विविध शिवकालीन वस्तूंची प्रतिष्ठानच्यावतीने पाहणी…

विविध शिवकालीन वस्तूंची प्रतिष्ठानच्यावतीने पाहणी…

मालवण

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभाग टिमने मसुरे गावात भरतगडाच्या पायथ्याशी माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर यांच्या घरी खोदकाम करताना सापडलेली तोफ पाहण्यासाठी आणि भरतगड आणि भगवंत गड अभ्यास मोहिम राबविली. यादरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने संग्राम प्रभुगावकर यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या घरी असलेल्या तलवारी, मशाली, नंदादीप, होन, पाणी भरण्याचा रांजण, दोन तोफ गोळे आणि कट्यार अशा शिवकालीन वस्तूंची प्रतिष्ठानच्यावतीने पाहणी करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभागतर्फे अशा विविध मोहिमा राबिण्यात येत आहेत. भरतगड मोहिम राबविताना संग्राम प्रभुगावकर यांच्या निवास्थानी प्रतिष्ठानच्यावतीने भेट देण्यात आली. त्यानंतर भरत गडावर भ्रमंती करण्यात आली. तेथे गडाचे काम चालू आहे. प्रभुगावकर यांनी लक्ष घालून निधी आणून भरतगडाच काम अतिशय सुंदर करून घेतल आहे. त्यानंतर प्रतिष्ठानतर्फे भगवंतगडाची पाहणी करण्यात आली. भगवंत गडाच्या पायथ्याशी नदीकिनारी तिनं बुरूज आहेत, ते ढासळल आहेत. बुरूज पाहिल्यानंतर प्रतिष्ठानचे पदाधिकारी गडावर गेले. दिंडी दरवाजातून गडावर गेल्यावर समोर सिद्धेश्वराच्या मंदिराचीही पडझड झाली आहे. तसेच बाजुला मोठी तुळशी वृंदावन आहे, गडावर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहेत. गडावरील काही बुरूज ढासळली आहेत. तसेच मुख्य दरवाज्याची पडझड झालेली आहे. गड पूर्णत: साफ करण्यासाठी आणि गडाची डागडूजी करण्यासाठी लवकरच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे लवकरच गड साफसफाई व डागडूजी मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. या मोहिमेत सहभागी दुर्गसेवक सुनील राऊळ, भास्कर मसदेकर, रीतेश राऊळ, अनिकेत चव्हाण, गणेश जाधव, प्रसाद राऊळ, प्रज्योत खडपकर आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 15 =