You are currently viewing युनिक अकॅडमी कणकवलीच्या नवीन जागेतील केंद्राचा उद्घाटन सोहळा १४ ऑक्टोबर रोजी

युनिक अकॅडमी कणकवलीच्या नवीन जागेतील केंद्राचा उद्घाटन सोहळा १४ ऑक्टोबर रोजी

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीएससी व इतर सर्व परीक्षांसाठी मोफत डेमो लेक्चर्सचे आयोजन

कणकवली

दहावी बारावीमध्ये अग्रेसर ठरणारा कोकण विभाग स्पर्धा परीक्षात खूपच मागे असतो. यासाठी जिल्ह्यातील पालकांनी चिंतन करण्याची गरज असून युनिक अकॅडमी कणकवली मागील सहा वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. विविध सरकारी विभागांमध्ये युनिकचे विद्यार्थी सेवा बजावत आहेत. युनिक अकॅडमी कणकवलीचे आता नवीन जागेत स्थलांतर झालेले असून येथील उद्घाटन सोहळा दि.14 ऑक्टो. 2022 रोजी सकाळी 11 वा. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते होणार आहे. कणकवली कॉलेज जवळ पोस्ट ऑफिसच्या वरती युनिकचे नवीन जागेत स्थलांतर झालेले आहे.

यावेळी जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांच्याशी वैशाली राजमाने संवाद साधणार आहेत. युनिक कणकवली मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार टीचिंग, मुंबई पुणेचे तज्ञ मार्गदर्शक, अद्ययावत नोट्स, वायफाय सह अभ्यासिका, सर्व प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी इतिहास प्रा. प्रशांत कांबळे, मुंबई आणि दि. 22 व 23 ऑक्टो. रोजी प्रा. राजेंद्र इंगळे यांची अर्थशास्त्र दोन दिवसीय मोफत कार्यशाळा सकाळी 10 सायं 4 यावेळेत होणार आहे. तसेच 29 व 30 ऑक्टोबर रोजी विज्ञान विषयाची मोफत कार्यशाळा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन युनिक अकॅडमी कणकवली मार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − sixteen =