You are currently viewing भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग आयोजित गो आयुर्वेद उपचार प्रशिक्षण संपन्न

भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग आयोजित गो आयुर्वेद उपचार प्रशिक्षण संपन्न

भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग आयोजित गो आयुर्वेद उपचार प्रशिक्षण संपन्न

*दि.२७फेब्रु.२०२२रोजी भागवत काका यांचे दत्त मंदिर, मळगाव,ता. सावंतवाडी येथे प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षण विषय-
जनावरांचे विविध आजार, त्याची प्राथमिक लक्षणे आणि त्यावर पारंपरिक ज्ञान व अनुभवातून सिद्ध झालेले गावठी उपचार
प्रशिक्षक-गोळवण ता. मालवण येथील प्रसिद्ध वैद्य श्री गवाणकर
पायलाग, वार न पडणे,अंग येणे, घोटीला सूज/घट्ट होणे,दूध न देणे, पोटात पाणी होणे,अजीर्ण होणे, घोणस/काजरा/कडवी चा विषार, कापरी ताप, लघवीचे आजार, धावरा, सल, अंगावर येणाऱ्या पुळ्या,विविध मुखरोग….अशा अनेक आजारावर स्थानिक परिसरातील वनस्पतीचा उपयोग करून औषधोपचार याविषयी ज्ञान मिळल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. औषधी उपयोग माहीत नसल्याने नष्ट होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन करण्याचा व जैव विविधता जपण्याचा निश्चय उपस्थित शेतकऱ्यांनी केला.
प्रशिक्षणाला १८गावातून ३०शेतकरी व भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याविषयी भारतीय किसान संघ च्या पुढील नियोजन विषयी माहिती साठी
संपर्क
सागर खानोलकर
मळगाव,ता. सावंतवाडी
(पशुधन आयाम जिल्हा प्रमुख) 7218343125
रामकृष्ण तथा मिलिंद पंत वालावलकर
मळगाव ता. सावंतवाडी
9421190322
तानाजी सावंत
आंबडपाल,ता कुडाळ
(जिल्हा अध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग)
9404943475

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =