आता राज्यात बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सुरवात..

आता राज्यात बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सुरवात..

स्व .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना – या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे – या यॊजनॆनुसार जखमींवर पहिल्या 72 तासांत संपूर्ण मोफत उपचार केली जाणार आहेत, हि खूप महत्वाची योजना आहे

पहा कशी आहे हि योजना ?

आज झालेल्या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या जखमीला वैद्यकीय उपचार मिळतील. तसेच रस्ते अपघातातील जखमीवर पहिल्या 72 तासांमध्ये मोफत उपचार केले जातील – मात्र यामध्ये आपण पण लक्षात घ्या कि आपल्या घरात घडलेले अपघात ,औद्योगिक तसेच दैनंदिन कामातील अपघात आणि रेल्वे अपघात यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही – आता या मध्ये उपचार कोणते होतील ते पहा –

याअंतर्गत रक्तपुरवठा थांबवणे, जखमेला टाके लावणे , अति दक्षता व वाँर्डमध्ये उपचार ,अस्थीभंग, डोक्याला लागलेला मार मणक्याला झालेली दुखावत, जळल्यामुळे झालेल्या दुखापतीवर उपचार ,रक्त आणि प्लाझ्मा पुरवठा तसेच डॉक्टरांनी सुचवलेल्या विविध तपासण्या व औषधोपचार उपचार दिल्या जातील. यामध्ये प्रत्येक रुग्णामागे 30 हजार रुपये वीमा कंपनीकडून अंगिकृत रुग्णालयात दिले जाणार आहे – या योजनेतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे एखाद्या रुग्णालयाने रस्ते अपघात वीमा योजनेअंतर्गत जखमींवर उपचार करण्याचे नाकारल्यास -किंवा कमी दर्जाची वैद्यकीय सेवा दिल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई होणार आहे.

अपघाता मध्ये जखमीं झालेल्यांसाठी राज्यसरकाची हि योजना खूप महत्वाची ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा