बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा थांबवा
बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा थांबवा - लखु खरवत

बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा थांबवा

बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा थांबवा – लखु खरवत
साटेली भेडशी पंचक्रोशीत बी एस एन एल नेटवर्कचा खेळखंडोबा सुरूच असून त्याचा त्रास मात्र या पंचक्रोशीतील ग्रामस्थाना भोगावा लागत आहे. वारंवार अनेक इशारे व आंदोलनाची निवेदने देऊनही संबधित विभागाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. यामुळे येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास शनिवारी बी एस एन एल च्या भेडशी कार्यालयाला ग्रामस्थानसह घेराओ घालून जाब विचारू व हा प्रश्न मार्गी लागे पर्यंत या विभागात ठाण मांडून बसण्याचा आक्रमक इशारा साटेली भेडशी सरपंच लखु खरवत यांनी दिला आहे.
साटेली भेडशी पंचक्रोशीत या नेटवर्कच्या खेळखंडोब्यामुळे रेशन दुकान, ऑनलाईन कामे, बॅंका आदी सेवांवर विपरीत परिणाम होत आहेत. या पंचक्रोशीतील लोकांना याचा आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक त्रास होत असून वारंवार यासाठी हेलपाटे मारावे लागतात. यामुळे येथील ग्रामस्थात या विषयी नाराजी असून त्याचा परिणामांना येत्या दोन दिवसात सेवा सुरळीत न झाल्यास संबधित विभागाला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी सरपंच लखु खरवत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा