You are currently viewing वेंगुर्लेत बिझनेस अकाउंटिंग व पर्यटन उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर होणार

वेंगुर्लेत बिझनेस अकाउंटिंग व पर्यटन उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर होणार

वेंगुर्ले

जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्ग च्यावतीने वेंगुर्ले येथे बिझनेस अकाउंटिंग व पर्यटनावर आधारीत उद्योजकता विकास कार्यक्रम सर्वसाधारण प्रवर्ग व विशेष घटक प्रवर्गातील युवक व युवतींकरीता स्वावलंबनासाठी 1 महिना कालावधीचा प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहे. सदरचा मोफत बिझनेस अकाउंटिंग व पर्यटनावर आधारीत उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याचा लाभ युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षिकासह सिंधुदुर्ग जिल्हयामधील उद्योग संधी, उद्योजकीय पाहणी तंत्र, उद्योग विषयक कायदे व रजिस्ट्रेशन उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा कौशल्य विकास व स्वयंमुल्यांकन, शासनाचे व बँकांचे कर्जविषयक धोरण व प्रकल्प अहवाल याबाबत माहिती देण्यात येणार असुन सदर प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येकी 1 महिना कालावधीचा असुन यशस्वीरीत्या पुर्ण करणाऱ्या लाभार्थीस 1000 रू. विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उमेदवार हा किमान 10 वी पास तसेच 18 ते 45 वयोगटातील असावा. कोणत्याही वित्तीय संस्थेचा किंवा बँकेचा थकबाकीदार नसावा. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी गणेश अंधारी मोबाईल नं.- 9423341888 किंवा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गनगरी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन एम.सी.ई.डी. ने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा