You are currently viewing फोंडाघाट हवेली नगर येथे शार्दोत्सवानिमित्त दांडिया नृत्याचे आयोजन 

फोंडाघाट हवेली नगर येथे शार्दोत्सवानिमित्त दांडिया नृत्याचे आयोजन 

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याद्वारे विजेत्यांना भेटवस्तू

फोंडाघाट

फोंडाघाट हवेली नगर मध्ये श्री.साईबाबा मंदिर शेजारी शारदोत्सवानिमित्त ९ दिवस  दांडीया नृत्य्याचे जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील अग्रगण्य डीजे अथर्व (D.J.Athrv) फोंडाघाट चे भव्य सादरीकरण मोठ्या स्किनवर दाखविले जाणार आहे. घटस्थापना आणि ९ व्या दिवसाचे प्रक्षेपण त्याच बरोबर लाईव्ह प्रक्षेपण फेसबुक  माध्यमातुन प्रसारण केले जाईल.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले गेले होते. मात्र आता यावर्षी हवेलीनगर उप्कर्ष मंडळातर्फे अत्यंत उत्स्फूर्तपणे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.  बाकी जिल्ह्यातुनही गरबा नृत्य, लोकल धनगरी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

याचा सर्वांनी लाभ घ्यावा.असे आवाहन अध्यक्ष आणि सर्व कमीटींनी केले.आहे.अनेक सेलिब्रिटी आणि विविध पक्षांचे लोक, आमदार, पालकमंत्रीही या शारदोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून सदिच्छा देणार आहेत. नवरात्र निमित्त आयोजित या ९ दिवसात होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना ३ लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. लकी ड्रा.मार्फत ज्यांची नावे येतील त्यांना शितल एजंसी मार्फत अजित नाडकर्णी यांचे कडुन भेट वस्तु प्रदान करण्यात येतील.*

प्रतिक्रिया व्यक्त करा