You are currently viewing उधळण विचारांची…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

उधळण विचारांची…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*….. उधळण विचारांची…*
*सेलीब्रेशन नात्यांचे..*

कालच साडी खरेदीला गेले होते तिथे दुकानात एक सखी आली , दादा साड्या दाखवा पण लाल आणि हिरव्या दाखवा , दुसरा रंग नको कारण मला सवाष्णीला द्यायच्या आहेत.. त्या तिच्या वाक्याने माझ्या कर्णपटलावर धडाधड चापट्या मारल्या , मी एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि माझ्या खरेदीत रमले… दुकानदार अनेक रंग, डिझाईन दाखवत होता पण मला काहीतरी हटके हवं होतं… त्यामुळे साड्या पहाण्यात रमले होते पण मनात त्या सखीचे वाक्य घोळत होतं..
नवरात्रीचे नउ रंग त्याशिवाय एकमेकांत मिसळुन तयार झालेले अनेक रंग , काळा , पांढरा , असे अनेक रंग आपलं आयुष्य सुंदर करतात मग सवाष्णीला लाल आणि हिरवाच रंग का ?? सगळे रंग हे सारखेच ना… आपण इथेही भेदभाव का करतो ?? .. आमच्याकडे काळा रंग चालत नाही हे मी अनेकदा ऐकलय पण त्यांनी कधी विचार केला असेल का ?? हा रंग आपल्याकडे का चालत नाही?? .. त्यांनी त्यांच्या घरातील मोठ्याना कधी विचारलं असेल का ?? .. की फक्त परंपरा आणि रूढी यावर डोळे झाकुन विश्वास ठेवायचा…त्यामागची कारणे आपण जाणुन घेतली पाहिजेत..
माझ्याच जातीतील आणि धर्मातील सवाष्ण मी बोलवावी हा भेदभाव तरी कशाला हवा आणि ज्यांना नवरा नाही किवा वेश्या, तृतीयपंथी , घटस्फोटीत यांना आपण या सगळ्यात का सामावुन घेत नाही.. खरं तर त्यांना आपल्यात सामावुन घेउन त्यांचा एकटेपणा दुर करुन , मी तुझ्यासोबत आहे ही ग्वाही आपल्या वागण्या बोलण्यात असणं
हीच पुजा आणि हाच उपवास ना…देवी या सगळ्या रुपात आहे मग भेदभाव विसरुन सण समारंभ साजरे करुयात… यावर्षीपासुन दसरा , दिवाळी सगळे सण सगळ्यासमवेत साजरे करुयात..
आणि हो त्या मावशीसाठी मी साडी आणली आहे तुम्ही ?? .. मी कोणाबद्दल बोलतेय तुम्हाला माहीत आहेच..
सोच बदलो
देश बदलेगा

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा