You are currently viewing जेंडर डीस्पोरीया……समझ गैरसमज उपाय

जेंडर डीस्पोरीया……समझ गैरसमज उपाय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या तथा अध्यक्षा, बालकल्याण समिती पुणे लेखिका डॉ.राणी खेडीकर लिखित अप्रतिम लेख*

 

*जेंडर डीस्पोरीया……समझ गैरसमज उपाय..*

 

“मेरा नाम डॉली हैं” असं म्हणत तो बालक माझ्या समोर बाकावर येऊन बसला.गेल्या काही दिवसांपूर्वी तो पोलिसांना मिळून आला होता.त्याचं बोलणं, वागणं काहीसं नाजूक होतं.ओठवर्ती अगदी बारीक केसांची लव होती.एक वेगळीच निरागसता होती त्या बालकात. वय अठराच्या थोडं आत होतं.त्या विशिष्ट उंबरठ्यावर असणाऱ्या बालका मध्ये जी एक प्रगल्भता यायला लागते ती जाणवत नव्हती त्याच्यात.मी विचारलेल्या प्रश्नांची जणू सवय झाली होती त्याला.म्हणून प्रश्ना आधी तो उत्तरं देत होता.” दीदी लोग पहेनते है वैसे कपडे पहनना मुझे अच्छा लगता है”.असं म्हणताना त्याने त्याच्या हातातला लेडीज रुमाल कितीतरी वेळा चुर्गळला होता.त्याला मुलीसारखं तयार व्हायला आवडतं आणि तो मुलगीच आहे असं तो सांगत होता. अशी बालके किती मानसिक,भावनिक गोंधळातून जात असतील स्वतः च स्वतःशी लढत असतील.हा विषय जितका गुंतागुंतीचा आहे तितकाच महत्त्वाचा देखील आहे.ही बालके ज्या कुटुंबात जन्म घेतात,ज्या वातावरणात लहानाची मोठी होतात त्याचा अभ्यास करता वेगवेगळी उत्तरं मिळतात. हा त्यांच्यातला वेगळेपणा कुटुंब, समाज स्वीकारत नाही मग त्यांच्यातील हा बदल चेष्टेची बाब बनतो आणि आतल्या आत ही बालके गुदमरू लागतात.त्यांना कसं सांभाळायचं हा गंभीर प्रश्न पालका समोर उभा राहतो.पालक देखील लोकं काय विचार करतील आणि समाज त्यांच्या कडे कोणत्या दृष्टीने बघणार या विचारात असतात आणि आपल्या बालकाला तो जसा आहे तसा त्याला स्विकारत नाही.मग सुरू होतो एक न संपणारा नकारात्मक प्रवास.ज्या प्रवासात पालक,बालक आणि समाज एकमेकांना झुंज देत राहतात.त्या सगळ्या प्रवासात ते बालक हरवून जातं कुठेतरी. वेड देखील ठरवल्या जातं.आणि अंधश्रध्दा जेव्हां कळस गाठते अश्या बालकांना कोणत्या तरी देवीचं रुप म्हणून वागवलं जातं.एखाद्या बालिकेला आपण मुलगा आहो आणि आपलं शरीर मुलीचे आहे अशी जाणीव होते आणि एखाद्या बालकास आपण मुलगी आहों आणि आपलं शरीर मुलाचं आहे अशी जाणीव होते तेंव्हा त्याच्या भावना तात्पुर्त्या आहेत का? कुटुंबातील किंव्हा त्याला आलेल्या एखाद्या वाईट अनुभामुळे आहेत का? याचा शोध घेणं आवश्यक आहे.या विषयावर कार्य करणाऱ्या संस्था यांच्याशी संपर्क करून त्या बालकाच्या विविध चाचण्या करून घेणं आवश्यक ठरतं.यातून आपल्याला ते बालक कळण्यास मदत होते.

Gender dysphoria is a term that describes a sense of unease that a person may have because of a mismatch between their biological sex and their gender identity.

याला Gender dysphoria असं म्हणतात.

काही विशेष लक्षणं यात दिसून येतात ती म्हणजे,

.distress.

.anxiety.

.depression.

.negative self-image.

.strong dislike of your .

.sexual anatomy.

.strong preference for the toys and activities associated with the other gender (in children)

त्यामुळे ही बालके काहीशी अस्वस्थ दिसून येतात.याची नेमकी कारणं काय असू शकतात याचा अभ्यास केल्यास वेगवेगळे विचार प्रवाह दिसून येतात.प्रामुख्याने काही विषेतज्ञ hormones in the womb हे देखील एक कारण असू शकणार असे मानतात तर काही विषेतज्ञ असे प्रतिपादन करतात की यात जीन्स, आणि सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटक गुंतलेले असू शकतात.

या चर्चेतून एवढं निश्चितच लक्षात येतं की ही काही चेष्टा करण्याची बाब नाहीय किंव्हा अंधश्रध्देच्या हवाली करण्या सारखी पण गोष्ट नाहीय.हा संपूर्णपणे अभ्यासाचा विषय आहे. आपलं बालक अंध असेल अपंग असेल आणखी काही special abilities असू दे आपण त्या बालकास आपलं म्हणून स्वीकारतोच ना.मग अशी लक्षणं बालका मध्ये दिसून येताच त्याचं योग निदान करण्याकडे आपला कल असायलाच हवा ना.

आता आणखी एक प्रश्न जो या बालकांच्या पालकांच्या मनात येतो तो म्हणजे, आपलं बालक थर्ड जेंडर आहे का? अशी भीती पालकांच्या मनात असते.आपला मुलगा मुली सारखा वागतोय मुळात हे त्यांच्यासाठी धक्का दायक असतं.हे बालक थर्ड जेंडर नाही.पण, त्याची योग्य काळजी देखभाल आणि स्वीकार झाला नाही तर मुलींचे कपडे घालून रस्त्यावर फिरून भिक्षा मागण्या पलीकडे काहीही पर्याय उरत नाही.आणि कोणीही या बालकांचे शोषण करण्याची संधी सोडत नाही. Gender dysphoria ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.

काही कौमार्य अवस्थेतील आणि अठरा वर्षे नुक्तीच पूर्ण केलेल्या बालकांशी या विषयावर चर्चा केली असता, त्यांचे विचार या बाबत बऱ्या पैकी मोकळे वाटले.पण थोड्या निम्न वर्गातील बालकांशी बोलल्या नंतर मात्र ते हा विषय तितकासा हाताळू शकले नाही.अर्थात आधी हसले आणि मुलांना मुला सारखंच रहायला पाहिजे असं त्यांचं मत होतं.शरीर मुलाचं असताना आपण मुलगी आहोत असं वाटणं हा केवळ गमतीचा विषय असू शकतो असं या बालकांचं मत होतं.पण शिक्षण घेत असणारे बऱ्या पैकी समाजात वावरणारे बालक या बाबत विषय समजून घेण्याच्या तयारीत दिसले.त्यांच्या एका मित्रा बाबत सांगताना ते म्हणाले,” तो अभ्यासात खूप हुशार आहे.त्याला इंजिनियर व्हयाचं आहे. पण त्याला नेहेमीच मुलगी असल्या सारखं वाटतं आणि तो हे लपवत असतो सगळ्या पासून.तो म्हणतो मी पैसे कमवल्या नंतर Gender Affirmation Surgery करून घेणार.आम्ही सगळे मित्र मैत्रिणी त्याच्या सोबत आहोत.” या पिढी मध्ये काही प्रमाणात स्वीकार दिसून येतोय असं वाटलं.मग समजून घेण्यात कुठे समस्या आहे? आई वडील , आजी आजोबा ही मागची पिढी याचा स्वीकार करताना फारसे दिसत नाही.आमच्या परिचयातील एक जोडपं तर आमच्या मुलाला मुला सारखं वाटावं म्हणून काही हार्मोन्स चे इंजेक्शन वगैरे असतात का असं विचारत होते.विषय अतिशय किचकट आहे.आई वडिलांच्या भावना एवढ्याच की त्यांच्या पाल्याला समाजा कडून नकारात्मक , अस्विकरात्मक वागणूक मिळू नये.कदाचित म्हणून पण ते ही गोष्ट स्वीकारत नाही.पण म्हणून हे बालक आपल्या कुटुंबा पासून लांब होतं जातं.पण असं होणं म्हणजे ते बालक असुरक्षित होत जाणं.समाजात बालकांचं अनेक प्रकारे गैरवापर करणारे लोक असतात त्यांच्या पासून या बालकांना खूप मोठा धोका संभवतो.यासाठी पालकांनी Gender dysphoria ची लक्षणं दिसून येता पालकांनी घाबरून न जाता.या बाबत सगळ्यात आधी विषेतज्ञाच मत घेणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या करून घेणं महत्त्वाचं ठरतं.Transgender Persons (Protection of Rights) Act, 2019 या नुसार यांच्या हक्काचे संरक्षण केलं आहे.भारतात देखील अनेकांनी आपल्या भावना आणि शरीर यांचा मेळ बसवत

Gender Affirmation Surgery करून घेऊन सामान्य प्रवाहात आयुष्य जगत आहेत.

बालकाचा स्वीकार करून त्याच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असं वातावरण कुटुंबात निर्माण करायला हवं.त्याची वेगळी स्वप्न, करियर बाबत विचार यावर मोकळी चर्चा करून त्याला काही गंभीर लक्षणं जडणार नाही याची काळजी घ्यावी.आपलं बालक अंधश्रध्दा किंवा चेष्टेचा विषय नाही ही गोष्ट आधी आपल्या कुटुंबियांना समजावून सांगावी.ही बालके कुटुंबात सुरक्षित राहू शकतात, शिकू शकतात,आपली स्वप्न, इच्छा पूर्ण करू शकतात.आपली साथ आणि स्वीकार त्यांचं आयुष्य घडवू शक्त.

 

डॉ राणी खेडीकर

अध्यक्ष

बाल कल्याण समिती पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा