You are currently viewing आदर्श विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची – नादकर बी.एस.

आदर्श विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची – नादकर बी.एस.

वैभववाडी

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महविद्यालय वैभववाडी येथे आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी विद्यार्थी शिक्षकाच्या अध्यापणाने झाली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज शिक्षक बनून अध्यापना मध्ये आपली रुची दाखवली. नंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांकडून महविद्यालयातील शिक्षकांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्राप्ती बाने हिने केले. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नादकर बी.एस होते. तसेच विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून सुबहानी बोबडे यांनी दिवसभराचे कामकाज पाहिले. कार्यक्रमाप्रसंगी श्री शिंदे एस.बी , सारंग एफ एच, सांस्कृतिक प्रमुख श्री. चव्हाण वाय.जी. यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक श्री पाटील पी.एम. ,माध्यमिक प्रमुख सौ. पाटील एस एस. यांची होती. सुत्रसंचालन कू. प्राप्ती सावंत आणि प्रतीक्षा रावराणे हिने केले. आणि आभारप्रदर्शन कू. साहिल शिरावडेकर याने केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री. मरळकर व्ही.एस, श्री पाटील पी.ए यानी पाहिले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक -शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा