You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान सोमवार दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर कालावधित आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी सुविधा व समुपदेशन ही केले जाणार आहे.

             जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण व महिला रुग्णालय या सर्व ठिकाणी दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विशेष तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये शासकीय आरोग्य संस्थामधील सर्व तज्ज्ञाव्दारे विशेष तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये हेल्थ आयडी (ABHA) कार्डस काढण्याकरिता रुग्णांनी सोबत येतेवेळी आधार कार्ड व लिंक असलेला  मोबाईल घेवून यावे.

              सर्वांनी अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे,बाह्य संपर्क अधिकारी  डॉ. सुबोध इंगळे, समन्वयक अधिकारी डॉ. संदेश कांबळे व डॉ. सई धुरी  यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा