You are currently viewing इतिहास आभ्यासक म्हणून रुपेश पवार यांचा श्री सुरेश सुर्वे यांच्या हस्ते सत्कार

इतिहास आभ्यासक म्हणून रुपेश पवार यांचा श्री सुरेश सुर्वे यांच्या हस्ते सत्कार

ठाणे :

 

ठाण्यातील मराठा मंडळ ठाणे या संस्थेने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या समारंभात साहित्यिक, पत्रकार अॅड रुपेश पवार यांचा अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री सुरेश सुर्वे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन रुपेश पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ह्या सांस्कृतिक संस्थेकडून दरवर्षी शिवजयंती विशेष अंक प्रकाशित करण्यात येतो. यावर्षीही हा अंक प्रकाशित करण्यात आला. यात “मुंबई शहर आणि सोळावे शतक” हा रुपेश पवार यांचा शिवकालीन इतिहास विषयक, विषेश लेख प्रसिद्ध करण्यात आला.

याप्रसंगी मराठा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी व्याख्याते साहित्य श्री नामदेवराव जाधव यांना विशेष मराठा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मराठा मंदिर मुंबई चे श्री शंकरराव पालदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षण विभाग, मुंबई महानगरपालिकेचे श्री. महेंद्र सावंत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिवरायांच्या इतिहासातून काय घ्यावे! हा विचार मांडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 11 =