You are currently viewing सावंतवाडी मळगाव येथे मादी गव्याचा मृत्यू

सावंतवाडी मळगाव येथे मादी गव्याचा मृत्यू

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथे मळगाव रेडकरवाडी येथील भातशेतीच्या बांधावर गवा मृतावस्थेत आढळून आला. मादी जातीचा हा गवा रविवारी सकाळी येथील शेतकरी महेश पंत वालावलकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्यासह वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक प्रकाश रानगिरे, बबन रेडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर पशुधन विकास अधिकारी डॉ. मृणाल वरठी यांना संपर्क साधण्यात आला.

डॉ. मृणाल वरठी यांनी घटनास्थळी दाखल होत गव्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत गव्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी एल ए मोडक, स्थानिक शेतकरी राजेंद्र रेडकर, मिलींद पंत, विनय पेडणेकर, अनिकेत रेडकर, दिवाकर खानोलकर, दयानंद मातोंडकर, अक्षय रेडकर, प्रतिक हरमलकर, विजय हरमलकर, वेदांत हरमलकर, दिलीप नाईक, सर्वेश कोचरेकर आदींचा शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान, या गव्याचा मृत्यू चारा खाताना जिभेला विषारी सापाच्या दंशामुळे झाला असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. मृणाल वरठी यांनी दिली. मृत गव्याच्या जिभेवर सर्पदंशाच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या. त्याची जीभ निळी पडली होती. तसेच तोंडातून फेस आलेला होता असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर मादी गवा ३ ते ४ वर्षांचा होता. गेले दोन दिवस या भागात गव्यांचा कळप येत होता. शनिवारी पहाटे येथे पेरणी केलेल्या भात शेतीची नुकसानी गव्यांनी केली होती.त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा एकदा या शेतात आले असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा