You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपासचा मळगांव कुंभारवाडी सर्व्हिसरोड धोकादायक

झाराप पत्रादेवी बायपासचा मळगांव कुंभारवाडी सर्व्हिसरोड धोकादायक

हायवेच्या भरावाची माती पाण्यासोबत रस्त्यावर

अनेक दुचाकीस्वारांचे अपघात : डागडुजीची मागणी

सावंतवाडी

मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवरील भरावाची माती पाण्यावाटे बाहेर येत असल्याने मळगांव कुंभारवाडी सर्व्हिस रोडवर चिखल साठून हा रस्ता धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना या चिखलमय मातीचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून अनेकजणांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून महामार्ग प्राधिकरणाने याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 2 =