You are currently viewing निलेश राणे यांच्या निर्णयावर मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त भावना

निलेश राणे यांच्या निर्णयावर मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त भावना

मालवण:

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या प्रमाणे कार्यकर्त्यांना प्रेम देणारे दिलदार नेतृत्व म्हणून निलेश राणे साहेब जनमाणसात परिचित आहेत. गेली काही वर्षे सातत्याने जनतेसोबत राहून जनहिताच्या दृष्टीने अधिकाधिक काम करताना भाजप पक्ष संघटना मजबूत करत आपल्या कार्याचा आगळा वेगळा ठसा आदरणीय निलेश राणे साहेब उमटवला आहे.

गेली १५ वर्षे थेट जनतेत राहून त्यांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवत आहेत. मागील काही वर्षे भाजपाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, अथवा स्वखर्चाने जनतेचे प्रश्न सोडवणे यालाच निलेश राणे यांनी प्राधान्य दिले. मागील काळात जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, ग्रामपंचायत आदी निवडणुकीत कुडाळ मालवण तालुक्यात भाजप पक्षाचा झेंडा सर्वत्र दिमाखात फडकला. या मिळालेल्या यशात निलेश राणे यांचे मोठे योगदान आहे.

भाजपा कुडाळ मालवण विधनासभा प्रमुख म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करत गावागावात भाजप संघटना अधिक मजबूत करत कार्यकर्त्यांत नवचैतन्य आणण्याचे काम निलेश राणे यांच्या माध्यमातून झाले. मालवण कुडाळचे भावी आमदार म्हणून निलेश राणेच असले पाहिजे ही आमच्या सारख्या हजारो कार्यकर्ते यांची भावना आहे. त्यांच्या नेतृत्वाची आम्हा सर्वाना गरज आहे. आम्ही सदैव खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहणार.

अश्या स्थितीत निलेश राणे साहेब सक्रिय राजकारणातून बाजूला जाऊच शकत नाही. कार्यकर्त्यांना ते एकाकी पडू देणार नाहीत. कार्यकर्त्यांना पोरके करणार नाहीत. निलेश साहेब नक्कीच आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील. अशी आमची प्रामाणिक भावना आहे. साहेब कार्यकर्त्यांचे मन जपणारे दिलदार नेतृत्व ही त्यांची ओळख सार्थ ठरवतील. कार्यकर्त्यांसाठी, भाजपाच्या माध्यमातून कुडाळ मालवणच्या विकासासाठी जनमताचा विचार करून निलेश राणे साहेब तुम्ही आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी आर्त भावना मालवण नगरीचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मांडली आहे. सोबतच शहरातील अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सुदेश आचरेकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा