You are currently viewing म्हापण प्रभागस्तरीय क्रिडा स्पर्धेत केंद्र शाळा परुळे  नं. ३ चे सुयश

म्हापण प्रभागस्तरीय क्रिडा स्पर्धेत केंद्र शाळा परुळे नं. ३ चे सुयश

वेंगुर्ला / परुळे :

म्हापण प्रभागस्तरीय क्रिडा स्पर्धा परुळेबाजार येसु आका मंदिर मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत म्हापण प्रभागातील शाळांनी सहभाग दर्शविला. यात परुळे नं. 3 शाळेने यश मिळवले यात ५० मी धावणे प्रथम ओमकार आत्माराम चव्हान उंच उडी द्वितीय, 200 मी धावणे, सार्थक तुषार परुळेकर (द्वितीय), १०० मी धावणे प्रथम चिन्मय शिवराय मडवळ, 200 मी धावणे व उंच उडी प्रथम विघ्नेश निलेश नानचे १०० मी ४४ रीले मुलगे प्रथम लहान गट कबडडी मुलगे प्रथम, लहान गट मुली द्वितीय, समुहगीत मोठा गट द्वितीय, ज्ञानी मी होणार लहानगट द्वितीय असे स्पर्धा मध्ये यश मिळवले.

याबद्दल मुलांना मुख्याध्यापक समीर चव्हाण, शिक्षक दत्तात्राय म्हैसकर, वैदही गोसावी शालीक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा