You are currently viewing आखाजी खानदेशी मातीचा सुगंध

आखाजी खानदेशी मातीचा सुगंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आखाजी खानदेशी मातीचा सुगंध*

 

खानदेश म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो काळ्या मातीचा प्रदेश, हिरवीगार शेती, आणि साधेपणाने जगणारी माणसं. या भूमीची खरी ओळख जपणारा सण म्हणजे आखाजी..या भूमीची खरी ओळख जपणारा सण म्हणजे आखाजी… अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साजरा होणारा हा सण खानदेशातील लोकजीवनाशी घट्ट जोडलेला आहे. आखाजी म्हणजे मातीशी, निसर्गाशी आणि परंपरेशी असलेलं नातं साजरं करण्याचा दिवस.

आखाजी हा सण खानदेशातील लोकजीवनाचा आत्मा आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साजरा होणारा हा सण केवळ धार्मिक नाही तर तो निसर्ग, परंपरा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम आहे… खानदेशात आखाजीला विशेष महत्त्व आहे.

आखाजीच्या दिवशी शेतकरी आपल्या शेताची पूजा करतात. मातीला आई मानून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवीन पिकांच्या हंगामाची सुरुवात या दिवसापासून केली जाते. “मातीचं देणं” ओळखून तिचा सन्मान करणं ही या सणाची मुख्य भावना आहे. त्यामुळे आखाजी हा केवळ धार्मिक सण नसून तो श्रमसंस्कृतीचा उत्सव आहे… या दिवशी गावागावांत आनंदाचं वातावरण असतं. लोक पारंपरिक पोशाख घालून सण साजरा करतात. स्त्रिया ओव्या म्हणतात…

झिम्मा-फुगडी खेळतात तर पुरुष ढोल-ताशांच्याय तालावर नाचतात. खानदेशी बोलीतील गाणी वातावरणात एक वेगळाच गोडवा निर्माण करतात. सगळीकडे उत्साह, आनंद आणि एकोपा दिसून येतो..

मुलांसाठी तर हा दिवस खास असतो

आखाजीच्या सणात खानदेशी खाद्य संस्कृतीचाही खास ठसा असतो. घराघरांत पुरणपोळी, भाकरी, लाडू, आणि इतर पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येऊन हा आनंद द्विगुणित करतात. एकमेकांच्या भेटीगाठींमुळे आपुलकी अधिक दृढ होते… आजच्या धावपळीच्या जीवनात जरी माणूस आधुनिकतेकडे वळला असला तरी आखाजीसारखे सण आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. खानदेशी मातीचा सुगंध, तिचं साधेपण आणि तिच्या कुशीतलं प्रेम या सणातून अनुभवायला मिळतं.

म्हणूनच आखाजी हा फक्त सण नाही तो आहे आपल्या संस्कृतीचा श्वास, मातीशी असलेलं अतूट नातं आणि साध्या आयुष्यातील खरा आनंद शोधण्याची प्रेरणा…

जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची शिकवण.

खानदेशी मातीचा सुगंध तिचं साधेपण आणि तिचं प्रेम या सणातून जिवंत रहात

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा