You are currently viewing माझी वसुंधरा अभियानात  अव्वल क्रमांक सावंतवाडी शहरवासीयांसाठी अभिमानास्पद

माझी वसुंधरा अभियानात अव्वल क्रमांक सावंतवाडी शहरवासीयांसाठी अभिमानास्पद

सावंतवाडी

माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपरिषदेला कोकण विभागात मिळालेला अव्वल क्रमांक ही बाब सावंतवाडी शहर वासियांसाठी अभिमास्पद असल्याचे गौरवोद्गार सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती अड. परिमल नाईक यांनी काढले.
संवाद साधताना ते म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या पुरस्काराचे सर्व श्रेय हे शहरवासियांच्या मानसिकतेला, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अथक परिश्रमाला तसेच पदाधिकाऱ्यांच्या संवेदनाशिलतेला दिले पाहिजे.
भविष्यात होणाऱ्या इतर आरोग्य विषयक स्पर्धेमध्ये हीच भूमिका अधिक जोमात वृद्धिंगत ठेवल्यास आपल्या शहराचं नाव राज्य, व राष्ट्रीय स्तरावर अग्रतेने अधोरेखित होईल असा विश्वास अँड. परिमल नाईक यांनी अभिनंदन करताना व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 9 =