You are currently viewing कंत्राटी भरती विरोधात महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने सावंतवाडीत निषेध

कंत्राटी भरती विरोधात महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने सावंतवाडीत निषेध

कंत्राटी भरती विरोधात महाविकास आघाडीचा भाजपच्या वतीने सावंतवाडीत निषेध

सावंतवाडी

सन 2003 साली मुख्यमंत्रीपदी सुशील कुमार शिंदे असल्यापासून सर्व शासकीय पातळीवर कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि हेच महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेते आता कंत्राटी भरती विरोधात बोंबाबोंब मारत आहेत. या महाविकास आघाडी पक्षांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिन्ही प्रमुख नेत्यांचा जाहीर निषेध भाजपच्या वतीने आज करण्यात आला. सावंतवाडी शहर मंडल व आंबोली मंडळ विभागाच्या वतीने रामेश्वर प्लाझा बिल्डिंग संजू परब यांच्या संपर्क कार्यालयाजवळ शनिवारी सकाळी या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. तर कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याबद्दल भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनचा ठरावही घेण्यात आला . सावंतवाडी येथे माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब ,शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे ,मळगाव प्रभारी सरपंच श्री हनुमंत पेडणेकर ,बंटी पुरोहित ,अजय सावंत ,अमित परब ,विनोद सावंत ,केतन आजगावकर, दिलीप भालेकर, एडवोकेट संजू शिरोडकर ,परीक्षित मांजरेकर, श्री चितारी चंद्रकांत जाधव, सौ साळगावकर आदी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा