वेंगुर्लेतील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना पिण्यासाठी गरमपाण्याच्या सोयीसाठी मशिनसह भांडे प्रदान

वेंगुर्लेतील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना पिण्यासाठी गरमपाण्याच्या सोयीसाठी मशिनसह भांडे प्रदान

या सेंटरमधील अन्य अत्यावश्यक वस्तुबाबत लायनेस प्रदीप वेंगुर्लेकर यांनी माहिती मागितली

वेंगुर्ले
कोरोना केअर सेंटर वेंगुर्ले यामध्ये दाखल होणाऱ्या व उपचार घेण्याऱ्या रुग्णांची पिण्याचे गरमपाण्या संदर्भात होणारी समस्या जाणून घेत वेंगुर्लेतील सामाजिक कार्यकर्ते तथा चार्टर इंजिनीयर विवेक कुबल यांनी आज बुधवारी कोरोना सेंटरमधील डॉ. निलेश अटक यांच्याकडे प्रदान केली.
सदर पिण्याचे पाणी गरम करणारी मशिन व त्याचे भांडे ही महत्वपूर्ण वस्तु कोरोना केअर सेंटरसाठी प्रदान करताना लायनेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रदीप वेंगुर्लेकर, सारस्वत बॅक वेंगुर्ले शाखेचे मॅनेजर कृष्णाजी ठाकूर, सेटरमधील आरोग्यसेविका (नर्स) नेहा टोपले, नम्रता कानसे, धनश्री देसाई, आरोग्यसेवक महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी लायनेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रदीप वेंगुर्लेकर यांनी कोरोना केअर सेंटरमधील रुग्णासाठी अत्यावश्यक सेवा देण्यात येण्याकरीता लागणाऱ्या वस्तुबाबत यावेळी माहिती मागितली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा चार्टर्ड इंजिनियर विवेक कुबल यांच्या या दातृत्वाबद्दल तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत व ग्रामीण रूणालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांच्यावतीने त्यांचे त्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा