You are currently viewing नांदगावात भारत माता यात्रेचे उस्फुर्त स्वागत.

नांदगावात भारत माता यात्रेचे उस्फुर्त स्वागत.

नांदगाव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग आयोजित भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने भारत गौरव यात्रा सुरू झाली आहे. याचा आज शुभारंभ विजयदुर्ग पासून सावंतवाडी पर्यंत होणार आहे.आज विजयदुर्ग देवगड शिरगाव नांदगाव तिठा मार्गे वैभववाडी येथे मार्गस्थ झाली आहे.
आज सायंकाळी नांदगाव तिठा येथे या भारत माता यात्रेचे आगमन झाल्यानंतर उस्फुर्त शालेय विद्यार्थी व पदाधिकारी यांनी जंगी स्वागत केले भारत माता की जय ,वंदे मातरम् अशा घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.तसेच भारत माता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी भाजपचे तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,उपसरपंच निरज मोरये, संजय गगनग्रास,मधू म्हसकर, श्रीकृष्ण वायंगणकर,प्रविण खरात, श्रीकृष्ण परब, दिपक खरात,वैभव वायंगणकर आदी उपस्थित होते.तसेच यात्रेमध्ये यात्रा प्रमूख अवधूत देवधर, हितेश गुरव, ओमकार सावंत, प्रथमेश फटकारे आदी भारत माता गौरव यात्रेबरोबर आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा