You are currently viewing कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ…

कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ…

 

नवी दिल्ली :

 

देशातील कोरोना प्रसाराचा वेग कायम असला, तरी मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटली होती. मात्र, रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतली असून, गेल्या २४ तासांत ७२ हजारांवर रुग्ण वाढले. तसेच मृतांची संख्याही वाढली असून, ९८६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ८८४ इतकी होती.

 

जागतिक उच्चांक नोंदवलेल्या भारतातील कोरोना रुग्णवाढ उतरणीला लागली आहे. ऑगस्टनंतर मागील २ आठवड्यांपासून कमी रुग्ण आढळून येत आहेत.मात्र, २४ तासांत पुन्हा ७२ हजारांवर म्हणजे ७२ हजार ४९ रुग्ण वाढले. अर्थात, कालच्या तुलनेत १० हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६७ लाख ५७ हजार १३२ इतकी झाली आहे. यात ९ लाख ७ हजार ८८३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ५७ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच कोरोनाबळींचा आकडा १ लाख ४ हजार ५५५ वर पोहोचला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा