You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या!

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सीईओ प्रजीत नायर, एसपी राजेंद्र दाभाडे यांचे आवाहन

“हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत कणकवलीत पत्रकार परिषद

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देश व राज्यभरात प्रत्येक आस्थापना व घरांवर 13 ते 15 ऑगस्ट कालावधी तिरंगा झेंडा फडकवण्यात संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर अडीच लाख झेंड्यांची मागणी करण्यात आली आहे. यातील काही तिरंगे प्राप्त झाले असून सर्वसामान्य जनतेला तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता आज पंचायत समिती आवारात तिरंगा वितरणाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी शिरोडा तिथे आले तिथे पण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे., यासोबत जिल्ह्यात शालेय स्तरावरती देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा, सायकल रॅली ते देखील आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हा असे आवाहन के मंजुलक्ष्मी यांनी केले. कणकवली पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ, आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, हर घर तिरंगा हा उपक्रम अगोदर 1 आठवडा राबवायचा होता. मात्र आता तो 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मात्र तिरंगा फडकवत असताना प्लास्टिक तिरंगा वापर करायचा नाही असे देखील आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रशासकीय कार्यालयांसमोरील तिरंगा झेंडा सूर्यास्तापुर्वी उतरवण्या बाबत कार्यवाही केली जाईल. मात्र घरोघरी फडकविण्यात येणारा तिरंगा 13 ते 15 या कालावधीत दररोज उतरवण्याची गरज नाही. मात्र तिरंगा उभारताना किंवा उतरवताना ध्वज संहितेचे पालन करा असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ध्वज संहिते बाबत जनजागृती होण्यासाठी आज प्रसिद्धी पत्रक देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था, महिला बचत गट, उमेद व जिल्ह्यातील व्यापारी संघटना यांना तिरंगा झेंडे उपलब्ध करून देण्याबाबत ही आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षे पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील सर्वांनी मिळून हा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करूया असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ज्या नागरिकांना तिरंगा झेंडा आवश्यक आहे अशांनी पंचायत समिती आवारातील स्टॉल, बचत गट व संबंधित विक्रेते यांची भेट घेत तिरंगा झेंडे घ्यावेत. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा झेंड्याची उभारणी करताना काळजीपूर्वक उभारणी करा. ज्या काठीवर झेंडा फडकवायचा असेल त्या काठी, ध्वजस्तंभ वर एकच झेंडा एका काठी, ध्वजस्तंभ याप्रमाणे उभारणी करा. पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे नियोजन करण्यात आले असून, पोलीस दलाकडून बँड पथक व संचलन उपक्रम राबवत उत्साहात अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे श्री दाभाडे यांनी सांगितले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर म्हणाले, ग्रामीण भागात 1 लाख 92 हजार तिरंगा झेंडे वितरणाबाबतचे नियोजन झाले आहे. ग्रामीण भागात ध्वज उभारणी करताना जनतेने ध्वजासहितेचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 30 ग्रा प ना हर घर जल घोषित करणार असल्याची माहिती श्री नायर यांनी दिली. तर 167 गाव ओडिअफ प्लस घोषित करण्यात येणार आहेत. शिरोडा येथे पुरातन मार्गाचे व महात्मा गांधीजी यांचे स्मरण करण्यात येणार आहे. आहे तर देवगड किल्यात सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविला जाणार आहे अशी माहिती श्री नायर यांनी दिली. तर आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. ध्वज संहितेचे पालन करण्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. असे श्री नायर यांनी सांगितले. नगरपालिका स्तरावर स्वनिधीतून हे झेंडे पुरवणार आहेत. तर सीएसआर निधीतून पण तिरंगा झेंडे पुरवठा करण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शिरोडा येथे महात्मा गांधीजींचे स्मरण करत असताना या ठिकाणी वाळू शिल्प पण साकारण्यात येणार आहे. 75 मीटर उंचीचा ध्वज उभारणी बाबत सूचना आहेत. कणकवली तहसीलदार कार्यालयात जरी याबाबत नियोजन करण्यात आले तरी, ध्वज संहिता पाळणे व अन्य बाबींच्या अनुषंगाने या संदर्भात पुढील वर्षी नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा