You are currently viewing वरवडे ग्रा.पं. व सावली फाउंडेशनतर्फे हॅन्डवॉश,साबण, वॉशिंग पावडर बनविण्याचे प्रशिक्षण

वरवडे ग्रा.पं. व सावली फाउंडेशनतर्फे हॅन्डवॉश,साबण, वॉशिंग पावडर बनविण्याचे प्रशिक्षण

कणकवली

वरवडे ग्रामपंचायत व सावली फाउंडेशनच्या वतीने वरवडे गावातील महिलांना फिनेल हॅन्ड वॉश कपड्याचे साबण वॉशिंग पावडर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना तसेच युवकांना स्वयंम रोजगार मिळून आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या हेतूने संस्था काम करत आहे यापुढील काळात शिक्षणासोबत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या किंवा ग्रामस्थांच्या व्यवसाय उद्योगधंद्याच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात प्रशिक्षण देण्याचा सावली संस्थेचा मानस आहे. त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी व रत्नागिरीचे प्रशिक्षक कांबळे सावली संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, पप्पू पुजारे, सदा चव्हाण व गावातील बचत गट प्रमुख व महिला वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा