You are currently viewing वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली वनविभाग आणि माता वैष्णोदेवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल ०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रा. द. घुणकीकर, वनक्षेत्रपाल कणकवली, ता. बा. दळवी, वनपाल दिगवळे, सुखदेव गळके, प्र. रा. शिंदे, श्रीमती दाभाडे वनसंरक्षक तसेच प्राचार्य समीर तारी, प्रा. प्रथमेश ठाकूर समन्वयक बी. एस्सी. हॉस्पीटॅलीटी, प्रा. अमरेश सातोस समन्वयक बॅन्कींग इन्शोरन्स आदी उपस्थीत होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना रा. द. घुणकीकर असे म्हणाले की, वन्यजीव संरक्षण ही काळाची गरज आहे. मानवी प्रगतीमध्ये जंगलसंर्वधन, वन्यजीव संरक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. वन्यजीव संरक्षण सप्ताहाचे महत्व सांगून तो याच कालावधीत का पाळला जातो, याबाबत सविस्तर माहिती मुलांना दिली. अनेक गावांमध्ये काही प्रथा परंपरांचे पालन केले जाते. ज्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. याबाबतीत युवावर्गाने देखील जनजागृतीचे काम केले पाहीजे असे श्री. घुणकीकर यांनी म्हटले.

यावेळी बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले, की वन्यजीव संरक्षण ही युवावर्गाची महत्वाची जबाबदारी आहे. सध्या सर्व युवावर्ग सोशलमिडीयाचा वापर करीत असतो. याच सोशल मीडीयाचा वापर वन्यजीव संरक्षण करीता करावा, असे आवाहन उपस्थीत विद्यार्थ्यांना केले. आज अनेक वन्यजीव हे अन्न व पाणी याकरीता मानवी वस्तीत येत आहेत. मानवावर या प्राण्याचे हल्ले होत आहेत. जंगल वाचविणे अत्यंत आवश्यक आहे, असे यावेळी प्राचार्य तारी म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेले श्री. राख, श्रीमती. दाभाडे या सर्वांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी भक्ती सावंत व्दीतीय वर्ष बी. एस्सी. तर आभार कुमारी सेजल एकावडे प्रथम वर्ष बी. एस्सी. यांनी मांडले. यावेळी प्रा. रश्मी मळेवाडकर, प्रा. मयुरी कोलसूलकर, प्रा. अनीता शेटकर आणि सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 19 =