You are currently viewing जागतिक पर्यटन दिनानिमीत्त महीलांकरीता जिल्हास्तरीय फळे , फळभाज्या व भाज्या यापासून सॅलेड डेकोरेशन स्पर्धेचे वेंगुर्लेत आयोजन

जागतिक पर्यटन दिनानिमीत्त महीलांकरीता जिल्हास्तरीय फळे , फळभाज्या व भाज्या यापासून सॅलेड डेकोरेशन स्पर्धेचे वेंगुर्लेत आयोजन

दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ = ०० वाजले पासुन साईदरबार हाॅल , वेंगुर्ले येथे स्पर्धेला सुरुवात

वेंगुर्ले

२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो . पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने व वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्थांच्या वतीने साईदरबार हाॅल, वेंगुर्ला येथे मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सदर सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे . त्यानिमित्ताने महिलांसाठी जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांपासून सॅलड डेकोरेशन स्पर्धा दुपारी (२ ते ६-३०) वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे . विजेत्या स्पर्धकांना रु २०००,१५००.१००० व उत्तेजनार्थ दोन अशी पाच रोख बक्षिसे , तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील . तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे असे आवाहन वेंगुर्ले तालुका पर्यटन महिला समितीतर्फे करण्यात आले आहे*.
*त्यासाठी आधी संपर्क साधून आपली नाव नोंदणी ९४२२०७७४६६ या नंबरवर करायची आहे* , *ही विनंती*

प्रतिक्रिया व्यक्त करा