You are currently viewing शृंगारिक लावणी

शृंगारिक लावणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री मृगनयना भजगवरे लिखीत अप्रतिम लावणी रचना*

*शृंगारिक लावणी*

*चार चौघात दाजी अस मला बाई छेडू नगा…*
*अवं पाहिल कुणीतरी ,जवळ अस ओढू नगा//धृ//*

*कोरस…(अवं पाहील कुणीतरी दाजी. जवळ हिला ओढू नगा..)*

*लाडिकं नजरनं मला बाई खुनविता..*
*करून भलते ईशारे,जवळ बोलविता..*
*येता जाता वाटत हो डोळा तुम्ही मारू नगा..*
*अवं पाहिल कुणीतरी, जवळ अस ओढू नगा..//१//*

*कोरस…(अवं पाहील कुणीतरी दाजी. जवळ हिला ओढू नगा..)*

*वय नुकतच सोळाव माझ सरलं..*
*पिरतीच वार अंगात तुमच्या भरलं..*
*तंग चोळीची दोरी माझ्या खोलू नगा…*
*अवं पाहिल कुणीतरी,जवळ अस ओढू नगा…//२//*

*कोरस…(अवं पाहील कुणीतरी दाजी. जवळ हिला ओढू नगा..)*

*भर ज्वानीत मुसमुसली ही काया…*
*तुमच्या मनावर थोडा ताबा ठेवा राया..*
*पिकल डाळिंब तुम्ही अस कचकन तोडू नगा…*
*अवं पाहिल कुणीतरी, जवळ अस ओढू नगा…//३//*

*कोरस…(अवं पाहील कुणीतरी दाजी. जवळ हिला ओढू नगा..)*

*चार चौघात दाजी अस मला बाई छेडू नगा…*
*अवं पाहिल कुणीतरी ,जवळ अस ओढू नगा//धृ//*

*©मृगनयना भजगवरे*✍️
मुंबई
८१०८९२७५०३

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =