You are currently viewing बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

गांधीचौक मंडळाच्या वतीने पदाधिकाऱ्यांची निवड

बांदा:

बांदा येथील गांधी चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने २६ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यात अध्यक्षपदी राकेश केसरकर, तर उपाध्यक्षपदी अनिल नाटेकर, सचिवपदी विवेक विरर्नोडकर, तर खजिनदारपदी ओंकार नाडकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.या बैठकीमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये २६ ला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना, २७ ला ‘भाव अंतरी’चे फेम प्रसिद्ध गायक मयूर गवळी दशावत्री नाटक, २८ ला गायन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५५५५, ३३३३, २२२२ रुपये अशी बक्षिसे आहेत. २९ व ३० ला भव्य खुली दांडिया स्पर्धा होणार असून अनुक्रमे ७७७७,४४४४,२२२२ रुपये व हिट जोडीसाठी आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरला १५ वर्षाखालील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. अनुक्रमे २२२२,११११,५५५ रुपये व उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर ग्रुपडान्स स्पर्धेसाठी अनुक्रमे ३३३३,२२२२,११११ रुपये व उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत . ३ ला डबलबारी भजनाचा सामना, ४ ला गोव्यातील नामांकित ऑर्केस्ट्रा व सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ, ५ ला सायंकाळी ५ वाजता विसर्जन मिरवणूक होणार आहे. दांडिया स्पर्धेसाठी ओंकार नाडकर्णी व अक्षय मयेकर, फॅन्सी ड्रेस, ग्रुप डान्ससाठी राजदीप पावसकर, गायन स्पर्धेसाठी प्रथमेश गोवेकर, धनेश नाटेकर येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =