You are currently viewing ऑनलाइन जुगार, दारू, अमली पदार्थ, फायनान्सची मनमानी या विरोधात पोलिसांनी जरब ठेवावी

ऑनलाइन जुगार, दारू, अमली पदार्थ, फायनान्सची मनमानी या विरोधात पोलिसांनी जरब ठेवावी

ऑनलाइन जुगार, दारू, अमली पदार्थ, फायनान्सची मनमानी या विरोधात पोलिसांनी जरब ठेवावी

मनसे नेते परशुराम उपरकर यांचे पोलीस अधीक्षकांकडे मागणी; कारवाया न झाल्यास आंदोलन

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण पिढी ऑनलाइन जुगार व अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली आहे. गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू राजरोजपणे सुरूच आहेत. हे बेकायदेशीर धंदे जिल्हा, राज्य, व आंतरराज्य अशा स्वतंत्र टोळ्या कार्यरत आहेत. म्हणूनच या सर्वच टोळ्यांचे म्होरके शोधून पोलिसांनी या जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायावर अंकुश ठेवावा. व जिल्हा पोलीस दलाची जरब या गुन्हेगारी म्होरक्यांवर ठेवून तरुण पिढीला वाचवावे अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार जीजी उपरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेऊन केली.

या विरोधात कारवाया न झाल्यास मनसे नागरिकांना घेऊन आंदोलन उभे करेल असा इशारा त्यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेक्यादेशीरपणे चालणारे ऑनलाइन जुगार, बेके देशी चालणारे गोवा बनवण्याच्या दारूची वाहतूक व विक्री, अमली पदार्थांचा या जिल्ह्यात खुलेआम सुरू झालेला व्यापार, नियमावलीचा वापर न करता फायनान्स कंपनीची या जिल्ह्यात सुरू झालेली गुंडगिरी या गंभीर विषयात परशुराम तथा जीजी उपरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या सर्वच विषयात पोलीस दल गांभीर्याने लक्ष घालेल व ठोस कारवाई करेल अशी ग्वाही दिल्याचे ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे अणाव चे माजी सरपंच आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी संतोष सावंत आदी उपस्थित होते.

ऑनलाइन गेम च्या नावाखाली राजरोजपणे बेकायदेशीर ऑनलाइन जुगार चालू झाला आहे. या ऑनलाईन जुगारात तरुण पिढी अडकली असून कर्जबाजारी झाली आहे. गाडी, घर, स्थावर मिळकत अशी मालमत्ता आपले मुले या जुकारात कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांच्याकडे घाण टाकाव्या लागल्या आहेत. अशा अनेक तक्रारी आता समोर येऊ लागल्यामुळे पोलिसांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक बनले आहे. कणकवली पोलिसांनी नुकतीच कणकवली ऑनलाइन जुगार विरोधात कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई झाली तरी हा जुगार नष्ट होण्यासाठी पोलीस विभाग आवश्यक आहे. याकडेही परशुराम उपरकर यांनी लक्ष वेधले आहेत.

त्याशिवाय या जिल्ह्यात अमली पदार्थांचा राज रोज व्यापार सुरू झाला आहे. शाळा कॉलेज पर्यटन स्थळे या गर्दीच्या ठिकाणी तरुण पिढीला नसली पदार्थांच्या जाळ्यात ओढणारे रॅकेट कार्यरत आहेत. याशिवाय या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू सप्लाय करणारे मोठे रॅकेट आहे. जिल्हास्तरावर राज्यस्तरावर व आंतरराज्य स्तरावर दारू वाहतूक व वितरण करणारे मोठी असून या सर्वच बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी आपला धाक ठेवावा, जरब ठेवावी तरच या जिल्ह्यात तरुण पिढीला वाचविता येईल अशी मागणी ही परशुराम उपरकर यांनी केली.

जिल्ह्यात सध्या वाहनांसाठी कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनी असून याही कंपन्यांचा मनमानी कारभार व गुंडगिरी सुरू झाले आहे. या कंपन्या आपल्या कार्यालयात कर्ज वितरणाची नियमावली लावत नाहीत व त्या नियमावलीची अंमलबजावणी न करता मनमानी व्याज व हप्ते वसूल करण्यासाठी गुंडगिरी सुरू केली आहे. वाहने ओढून नेणे, कर्जदाराला धाक दपटशहा दाखवून मानहार करण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. या फायनान्स कंपन्यांच्या या मनमानी कारभारावरही पोलीस दलाने अंकुश ठेवावे अशी मागणी जी जी उपरकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा