You are currently viewing आजगाव हायस्कूलच्या बँडच्या वाद्यसंचाची पूर्तता

आजगाव हायस्कूलच्या बँडच्या वाद्यसंचाची पूर्तता

*बाबांची जन्मशताब्दी (कै. वामन नारायण सौदागर ३०/८/२३ ते ३०/८/२४) अंतर्गत आजगाव हायस्कूलच्या माझी विद्यार्थी संघाचा पुढाकार*

 

सावंतवाडी :

 

आजगाव येथील साहित्यिक विनय सौदागर व कुटुंबियांकडून बाबांची जन्मशताब्दी निमित्त दर महिन्याच्या ३० तारखेला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. जानेवारी महिन्यात देखील श्री. व्ही.टी. केदार व अविनाश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलला बँड पथक साहित्य देण्याचे नियोजन केले आणि त्याची पूर्तता देखील करण्यात आली.

‘विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव’ चे बँड पथक गेले कित्येक वर्षे बंद होते. ते सुरू व्हावे म्हणून हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघामार्फत पुढाकार घेण्यात आला. ढोलाची फायबर पाने बदलणे, ड्रम दुरुस्त करणे, त्याच्या स्टीक घेणे, खुळखुळे – ट्रँगल – खंजिरी – झांजा आदी नवीन घेणे आदी गरजा होत्या. मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी बँडच्या वाद्यसंचाची पूर्तता करण्यात आली. यासाठी ₹ ३४२०/- खर्च आला. हा खर्च आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सौदागर कुटुंबियांकडून करणेत आला. (वडीलांच्या जन्म शताब्दीनिमित्त या वर्षी दर ३० तारखेला एक उपक्रम राबविण्यात येतो) अशी माहिती साहित्यिक विनय सौदागर यांनी दिली आहे.

गुरुवार दि. १ फेब्रुवारीपासून मुलांचा सराव घेण्यात येईल. याकामी विद्याविहार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.भागीत सर यांचे उत्तम सहकार्य लाभले. सौदागर कुटुंबियांच्या उदार मनाने केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =