You are currently viewing महायुतीत कुणी अपशकून करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही; नारायण राणे

महायुतीत कुणी अपशकून करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही; नारायण राणे

महायुतीत कुणी अपशकून करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही; नारायण राणे

वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी स्टेटस ठेवत असेल तर ते चुकीचे

सावंतवाडी

महायुतीचा काम सुरळीत व गुण्यागोविंदाने सुरू आहे, असे असताना वैयक्तिक स्वार्थासाठी स्टेटस ठेवून महायुतीत अपशकून केल्यास सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी आज सावंतवाडी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता दिला.

माजी आमदार राजन तेली यांनी कोणाच्यातरी हट्टा मुळे दोन वेळा सभा रद्द करावी लागली यावेळी मी दिलगीर आहे अशा प्रकारचा स्टेटस ठेवला होता व सदरचा स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याच पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता असा स्टेटस कोणी जर ठेवला असेल तर ते चुकीचे आहे, युतीचे महायुती गुण्यागोविंदाने नांदत असताना कोणी अपशकून करू नये, पक्षाच्या दृष्टीने हे बरोबर नाही व पक्षाच्या हितापुढे मी कोणाचीही गय करणार नाही असा इशारा यावेळी बोलताना दिला.

माझ्या जन्म कुंडली मनधरणी करणे,समजावणे हा शब्द नाही त्यामुळे मी कोणाला समज देण्याच्या भानगडीत पडत नाही, जे काय आहे ते रोखठोक असेल असेही यावेळी बोलताना नारायण आणि म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा