You are currently viewing सांगिर्डेवाडी उद्यमनगर पाणी प्रश्न मार्गी लागणार…..

सांगिर्डेवाडी उद्यमनगर पाणी प्रश्न मार्गी लागणार…..

कुडाळ

कुडाळ शहरातील उद्यमनगर व सांगिर्डेवाडी येथील पाणी पुरवठा मुंबई गोआ चौपदरीकरणाच्या कामामुळे अनियमित असून तो पुन्हा गेले ६ ते ७ दिवस पूर्णतः ठप्प झाला आहे.
भूमी अभिलेख, महामार्ग प्राधिकरण यांच्या भूसंपादनाच्या गोंधळामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्याप पैसे मिळालेले नसून काहींना अजून नोटीसही बजावण्यात आलेल्या नाहीत असे असतानाही ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉम ही घाईघाईने रात्रीच्या वेळी काम करून अनेक समस्या नियमित उभ्या करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक विनायक राणे, पाणी पुरवठ्याचे काम करणारे पोट ठेकेदाज खानोलकर व दिलीप बिल्डकॉम यांच्याकडे सतत पाठपुरावा करून श्रीरामवाडी पर्यंत दोन दिवसापूर्वी पाणी चालू करून घेतले परंतु त्याच्या पुढील पाणी चालू होण्यासाठी पाइपलाईन घालताना हॉटेल राज चे मालक यांनी आपल्याला पैसे मिळाल्याचे सांगितल्याने तेथे काम थांबवावे लागले.

मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयात वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गाढवे, नगरसेवक विनायक राणे, भाजपचे कार्यकर्ते निलेश तेंडुलकर, राजन नाईक, रत्नाकर प्रभू, राजेश वालावलकर, महामार्गाचे महाजन, दिलीप बिल्डकॉमचे परिहार, भूमी अभिलेखाचे सँडीम, रुपेश राऊळ, नगरपंचायतीचे पाणी पुरवठा विभागाचे आजगावकर या सर्वांची सुमारे १ ते दीड तास चर्चा करण्यात आली व त्याप्रमाणे राजेश वालावलकर यांनी पैसे मिळण्याबाबत आश्वासित करण्यात आले.
त्यामुळे पाईपलाईन घालण्याचा मार्ग तूर्त तरी सुटला असून अजून अनेक सर्व्हे नं. व प्रत्यक्षात भूसंपादन यातला घोळ काही संपत नसून पुन्हा पुन्हा यात अडचणी येतच राहणार आहेत. प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी लवकरच सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचललेली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + six =